Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा गुरुवारी पालकमंत्र्यांच्या घरावर चड्डी मोर्चा व बेमुदत ठिय्या

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा गुरुवारी पालकमंत्र्यांच्या घरावर चड्डी मोर्चा व बेमुदत ठिय्या



सांगली : स्वाभिमानी शेतकरी संघटनेची राज्य कार्यकारिणी ची बैठक सोमवार दि. ५ जून रोजी असल्याने पालकमंत्र्यांच्या घरावर काढण्यात येणारा मोर्चा पुढे ढकलला असून आता गुरुवार दिनांक 8 जून रोजी पालकमंत्री यांच्या घरावर चड्डी मोर्चा व बेमुदत ठिय्या आंदोलन करणार असल्याची माहिती स्वाभिमानी चे जिल्हा अध्यक्ष महेश खराडे यांनी दिली. खराडे म्हणाले 8 जून रोजी सकाळी दहा वाजता क्रांतिसिंह नाना पाटील पुतळा विश्राम बाग चौक सांगली येथे जमायचे आहे तेथून पालकमंत्री यांच्या 100 फुटी रस्त्यावरील बंगल्यावर हा मोर्चा जाणार आहे.

थोडी लढाई जिंकली अजून लढाई बाकी आहे असे सांगून खराडे म्हणाले, आता नाही तर कधीच नाही म्हणून द्राक्ष बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांनो उठा जागे व्हा संघर्षाचा धागा व्हा. अनुदान, विमा, जाहिरात, पोषण आहार, जी एस टी यासाठी आता लढायच, संघर्ष करायचा आहे. संकटाला शरण जावू नका लढण्यासाठी मैदानात या. लढलो तर जिंकणारच असा आशावाद व्यक्त करून खराडे म्हणाले कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रती क्विंटल ३०० रुपये अनुदान दिले त्याच धर्तीवर द्राक्षबागेला एकरी एक लाख रुपये तसेच बेदाण्याला प्रती टन एक लाख रुपये अनुदान द्या, औषधाच्या किमती कमी कराव्यात,

नुकताच जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला या मोर्चानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार जिल्हा उपनिबंधक मंगेश सूर्वसे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली या बैठकीत उशिरा दाणा पेमेंट केल्यास २ टक्के व्याज देण्याचा निर्णय झाला, ५०० ग्रॅम पेक्षा जास्त तूट धरल्यास संबधित व्यापाऱ्याला पुढील तीन सौद्यात भाग घेण्यास बंदी घालण्याचा निर्णय झाला, बेदाणा बॉक्स चे निम्मे पैसे देण्याचा निर्णय झाला मात्र त्याची अंमलबजावणी पंढरपुर, सोलापूर आणि विजापूर या ठिकाणी ही तसा निर्णय झाल्यानंतर अंमलबजवानी करण्याचे ठरले अन्यथा तासगाव आणि सांगलीत च लागू झाल्यास बॉक्स चे निम्मे पैसे खरेदीदार देणार आहेत त्यामुळे ते अन्य बाजार पेठेत जातील त्यामुळे या बाजार पेठा धोक्यात येतील त्यामुळे सामुदायिक निर्णयानंतर अमल बजावणी करण्याचे ठरले कोल्ड स्टोरेज भाड्याचा स्लॅब १५ दिवसाचा करण्याचा निर्णय झाला, दलालाना परवाना देण्यासंबधी समिती व कृषी विभागाच्या वतीने प्रयत्न करण्याचे ठरले या सर्वाची अमल बजावणी होते की नाही हे पाहण्यासाठी दर तीन महिन्यांनी बैठक घेण्याचा निर्णय झाला थोड प्रयत्न केला तर काही तरी पदरात पडले. आता पुन्हा राज्य पातळी वरील प्रश्नासाठी लढायचे आहे संघर्ष करायचा आहे संघर्ष केला तरच द्राक्ष शेती वाचेल अन्यथा ती चित्रात बघावी लागेल अशी भीती ही त्यांनी बोलून दाखविली 8 जून रोजी काढण्यात येणाऱ्या मोर्चाच्या प्रमुख मागण्या

द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याला एकरी एक लाख अनुदान द्या कारण द्राक्षाची विक्री प्रती किलो ५ ते २५ एवढ्या कमी दराने झाली आहे द्राक्ष उत्पादक तोट्यातच आहे त्यामुळे त्याला मदत करणे गरजेचे आहे. बेदाणा उत्पादक शेतकऱ्याला प्रती टन एक लाख रुपये अनुदान द्या कारण बेदाणा उत्पादन प्रचंड वाढल्याने दर वाढण्याची शक्यता नाही आता दर प्रती किलो १०० पेक्षा कमी आहे

सद्या जाहिरातीचा जमाना आहे जाहिरात बघून काहीही विकत घेण्याचा समाजाचा ट्रेण्ड आहे सद्या द्राक्ष आणि बेदाना खप कमी झाला आहे डॉक्टर ही द्राक्षे खावू नका असे सांगत आहेत त्यामुळे ही समस्या उद्भभवत आहे त्यामुळे द्राक्ष आणि बेदाणा खाणे कसे हितकारक आहे याची ब्रँड हिरो घेवून पणन महामंडळाने टी वी वर जाहिरात करावी

सद्या ग्लोबल वॉर्मिग मुळे हवामान बदलत आहे त्यामुळे ऋतू मानही बदलत आहे उन्हाळ्यात पावसाळ्या सारखे वातावरण आणि पावसाळ्यात उन्हाळ्या सारखे वातावरण होत आहे बदलत्या वातावरणाचा सर्वात जास्त द्राक्ष शेतीला फटका बसतो आहे. त्यामुळ द्राक्ष शेती विमा सुरक्षित केली पाहिजे सध्याची विमा योजना बंद करून नवीन बारमाही द्राक्ष पीक विमा योजना सुरू करावी उदा. वाहन आणि माणूस याची विमा योजना जशी आहे तशी द्राशासाठी विमा योजना सुरू करावी गंडा टाळण्यासाठी दलालांना परवाना सक्तीचा करावा तसेच गंडा घालणाऱ्या ना अटक करण्यासाठी राज्य व्यापी पोलीस पथक तयार करावे त्याच्यावर कठोर कारवाई व्हावी यासाठी कायद्यात बदल करावा औषधाच्या किमती कमी कराव्यात त्यावरील जी एस टी कमी करावा शेतकऱ्यांना कमी दराने मध्यम व दीर्घ मुदतीचा कर्ज पुरवठा करावा बेदाणा पणन नियमनात आणावा

बेदाण्याचा शेती मालात समावेश करावा सद्या बेदाणा प्रक्रिया माल धरून त्यावर जी एस टी आकारला जातो त्यामुळे बेदाणा शेतीमाल समजून कोल्ड स्टोरेज मधील भाड्यावरील जी एस टी आकारणी बंद करावी. बेदाण्याचा शालेय पोषण आहारात समावेश करावा, बेडाण्याचा पुरवठा लष्कराला करावा, बेदाण्याला हमी भाव लागू करावा गारपीट अवकाळी पाऊस या पासून रूफिंग प्लास्टिक कव्हर.

अनेक बागायतदार बागावर घालत आहे त्यासाठी ५० टक्के अनुदा आदीसह अन्य मागण्यासाठी सदर आंदोलन गुरुवार दिनांक 8 जून रोजी सकाळी दहा वाजता सांगली क्रांतिसिंह पाटील पुतळा विश्रामबाग चौक ते पालकमंत्री बंगला १०० फुटी रोड विश्राम बाग सावरकर कॉलनी सांगली येथे जायचे आहे.

आंदोलनाला माणसे जास्त प्रश्न लवकर सुटेल, माणसे कमी प्रश्न सुटण्यास उशीर लागणार* स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडे जादूची कांडी नाही त्यामुळे आंदोलनाला जास्तीत जास्त माणसे आणण्यासाठी सर्वांनी जास्तीत लोकांना भेटून सांगा, फोन करा, बैठका घ्या, what's up फेसबुक इंस्टाग्राम आदी सोशल मीडियाचा वापर करा गावातील स्पीकरवरून पुकारून सांगा, दवंडी पिटा जेणेकरून सर्वांना आंदोलनाची माहिती पोहचेल तरी द्राक्ष व बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येनं राजकारण बाजूला ठेवून आपल्या हितासाठी या मोर्चात सहभागी व्हावे जेवढी संख्या जास्त तेवढा प्रश्न सुटण्यास मदत होईल असे आवाहन खराडे यांनी केले आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.