Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

गर्भधारणेसाठी पती ऐवजी दुसर्‍या व्यक्तीचे शुक्राणू ,डॉक्टरना ठोठावला दीड कोटींचा दंड

गर्भधारणेसाठी पती ऐवजी दुसर्‍या व्यक्तीचे शुक्राणू ,डॉक्टरना ठोठावला  दीड कोटींचा दंड


नवी दिल्ली : एका महिलेला गर्भधारणा होण्यासाठी तिच्या पतीऐवजी वेगळ्याच व्यक्तीच्या शुक्राणूंचा डॉक्टरांनी उपयोग केला होता. याप्रकरणी दिल्लीतील एक खासगी रुग्णालय व संबंधित डॉक्टरांना राष्ट्रीय ग्राहक विवाद निवारण आयोगाने दीड कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.

गेल्या काही वर्षांत अनैतिक पद्धतींचा अवलंब करून उपचार झाल्याच्या अनेक घटना उजेडात आल्या आहेत. २००९ मध्ये एका महिलेने एटीआर तंत्रज्ञानाच्या साहाय्याने जुळ्या मुलांना जन्म दिला. पालकांकडून मुलांकडे अनुवांशिकरीत्या जे रक्तगट संक्रमित होतात, त्यापेक्षा या मुलांचे रक्तगट निराळे होते. तसेच, या महिलेचा पती सदर मुलांचा जैविक पिता नाही हे त्यांच्या डीएनए प्रोफाइलवरून स्पष्ट झाले. डॉक्टरांनी केलेली लबाडी लक्षात आल्यानंतर पती-पत्नीने दोन कोटी रुपये नुकसान भरपाईचा दावा राष्ट्रीय ग्राहक विवाद निवारण आयोगाकडे दाखल केला.

डॉक्टरांनी पतीऐवजी वेगळ्याच व्यक्तीचे शुक्राणू गर्भधारणेसाठी उपयोगात आणल्याचे कळल्यानंतर महिलेवर झालेला भावनिक आघात, त्यामुळे निर्माण झालेला कुटुंबकलह अशा काही गोष्टी आयोगासमोर दाखल केलेल्या याचिकेत नमूद करण्यात आल्या होत्या.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.