Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

बाजार समितीतील नोकरभरती प्रकरण; गहाळ कागदपत्रांचा अहवाल सादर करा

बाजार समितीतील नोकरभरती प्रकरण; गहाळ कागदपत्रांचा अहवाल सादर करा 

सागंली: कृषी उत्पन्न बाजार समितीत 2018-19 मध्ये नोकरभरती करण्यात आली होती, नोकरभरतीमध्ये गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी दाखल झाल्या होत्या. याप्रकरणी पणन विभागाने चौकशीचे आदेश दिले होते. त्याचा अहवाल प्राप्त झालेला नाही, मात्र चौकशी अधिकाऱयांकडून नोकरभरतीची कागदपत्रे गहाळ करण्यात आल्याची पुन्हा तक्रार करण्यात आली. त्यानुसार या कागदपत्रांबाबतचा अहवाल तत्काळ देण्यात यावा, असे आदेश पणन उपसंचालकांनी जिल्हा उपनिबंधकांना दिले आहेत.

सांगली बाजार समितीमध्ये 2018-19 मध्ये लिपिक आणि शिपाईपदाच्या वीस जागांसाठी नोकरभरती करण्यात आली होती. या भरतीमध्ये गैरप्रकार झाल्याबाबतची तक्रार स्वतंत्र भारत पक्षाने केली होती. बाजार समितीमध्ये लाखो रुपये घेऊन सभापती व संचालकांनी नोकर भरती केल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकाराची दखल घेऊन पणन संचालकांनी चौकशीचे आदेश दिले होते.

मात्र, चौकशी अधिकाऱयांनी कागदपत्रे गहाळ झाल्याचे सांगितले. जाणीवपूर्वक भ्रष्टाचार दडपण्यासाठी बाजार समितीच्या माजी सभापती व संचालकांनी हा प्रकार केलेला असल्याची पुन्हा तक्रार स्वतंत्र भारत पक्षाने केली आहे. त्यामुळे नोकरभरतीच्या कागदपत्रांबाबतचा अहवाल तत्काळ देण्यात यावा, असे आदेश पणन उपसंचालकांनी दिले आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.