Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये सलमान खानचा डान्सचा जलवा

मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये सलमान खानचा डान्सचा जलवा 


मुंबईची जान म्हणजे लोकल ट्रेन...मुंबईची लाइफलाइन असं तिला म्हटलं जातं. सतत खचाखच भरलेली लोकल ट्रेन जेव्हा लॉकडाऊनमध्ये बंद होती. जणू मुंबईने श्वास घेणेचं थांबवलं होतं. लोकल ट्रेनमधून असंख्य प्रवासी प्रवास करत असतात. सोमवार असो की रविवार मुंबईकरत कधी थांबत नाही. आज रविवारी मुंबई लोकलच्या मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. त्यामुळे आजच्या दिवशी सुट्टीचा आनंद घेण्यासाठी बाहेर पडणार असाल, शिवाय खाजगी कंपनीत कामावर असलेल्यांनी आज लोकलचं वेळापत्रक पाहूनच बाहेर पडणं योग्य होईल. अन्यथा त्यांना नाहक त्रास सहन करावा लागू शकतो. 

अन् लोकल ट्रेनमध्ये सलमान अवतरला...

मुंबई लोकल ट्रेनमधील अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. महिला लोकल डब्यातील अनेक व्हिडीओ इंटरनेटवर वाऱ्यासारखे पसरतात. असाच एक लोकल ट्रेनमधील डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर सगळ्याचं लक्ष वेधून घेत आहे. जेव्हा सलमान लोकल ट्रेनमध्ये अवतरतो. हा व्हिडीओ पाहून नेटकरी हैराण झाले आहेत. निळा रंगाचा टीशर्ट आणि काळ्या रंगाची जीन्स पँट घालून जेव्हा सलमान धावत्या लोकलमध्ये जलवा दाखतो. प्रवाशीही त्याला पाहून अवाक् होतात.

या व्हिडीओमध्ये दिसणारा व्यक्ती हा सलमान खान नाही तर त्याच्यासारखा दिसणारा एक तरुण आहे. त्याने सलमान खानसारखा डान्स करुन प्रवाशांचं मनोरंजन केलं. त्याचा हा हटके डान्स पाहून प्रवाशांनीही त्याला अगदी मनापासून दाद दिली. अनेक प्रवाश्यांनी त्याचा डान्स आपल्य कॅमेऱ्यात कैद केला. हा व्हिडीओ सध्या इंटरनेटवर ट्रेंडिंगमध्ये आहे. सलमान खानचे देशभरात लाखो चाहते आहेत. त्यामुळे जेव्हा सलमान खान सारखा दिसणार हा तरुण लोकल ट्रेनमध्ये येतो तेव्हा अनेक प्रवासी क्षणासाठी बिचकळ्यात पडतात. 

सलमान सारख्या दिसणाऱ्या या तरुणाचं नाव झोएब सय्यद... झोएब सय्यद हा कलाकार असून तो इन्टाग्रामवर प्रसिद्ध आहे. अनेक कार्यक्रमात झोएब सलमान खानची  ची नकल करतो. हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील salman2zz या अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.