वाळू तस्करीतून सख्ख्या भावांवर हल्ला, एकाचा मृत्यू
सांगली : कडेगाव तालुक्यातील कान्हरवाडी येथे वाळू तस्करी केल्याच्या कारणावरून सात जणांनी दोन सख्ख्या भावांवर तलवार, चाकू, कुराड, लोखंडी गजाने केलेल्या हल्ल्यात लहान भावाचा मृत्यू झाला तर मोठा भाऊ गंभीर जखमी झाला आहे. शनिवारी रात्री दहाच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी कडेगाव पोलिस ठाण्यात सातजणांविरोधात खून, खुनाचा प्रयत्न आदी कलमांखाली रविवारी सकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान यातील दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती पोलिस निरीक्षक पांडुरंग भोपळे यांनी दिली.
सचिन हणमंत मदने (वय ३२) असे मृताचे नाव आहे. तर खंडू हणमंत मदने (वय ३५) असे गंभीर जखमीचे नाव आहे. याप्रकरणी लक्ष्मण जगन्नाथ मदने, किरण लक्ष्मण मदने, सूरज संजय मदने, सौरभ संजय मदने, करण गुलाब पाटोळे, अजूर्न गुलाब पाटोळे, महेंद्र बबन पाटोळे (सवर् रा. कान्हरवाडी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी अशोक हणमंत मदने यांनी फियार्द दिली आहे.
मृत सचिन मदने आणि त्याचा भाऊ खंडू यांनी येरळा नदी पात्रातून पिकअप गाडीतून (क्र. एमएच १२ डीटी २७) वाळू भरून आणल्याच्या कारणावरून हा हल्ला करण्यात आल्याचे फियार्दीत म्हटले आहे. यावेळी सूरज मदने याने त्याच्याकडील तलवारीने तसेच किरण मदने याने त्याच्याकडील चाकूने सचिन मदने याच्यावर जीवे मारण्याच्या उद्देशाने पाठीवर वार केले. तसेच लक्ष्मण मदने याने त्याच्याकडील कुराडीने दोघांवर वार केले. तसेच सौरभ मदने, करण पाटोळे, अजुर्न पाटोळे, महेंद्र पाटोळे यांनी यांनी लोखंडी गज तसेच लाकडी दांडक्याने दोघांवर हल्ला केल्याचे फियार्दीत म्हटले आहे. हा हल्ला केल्यानंतर हल्लेखोर तेथून पसार झाले. जखमी दोघांनाही रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी सचिनचा मृत्यू झाल्याचे डॅक्टरांनी जाहीर केले. याप्रकरणी सातजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून सहायक पोलिस निरीक्षक संतोष गोसावी यांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.