महिला पोलीस अधिकाऱ्याचीच फसवणूक: आरोपीस अटक
वाहतूक विभागात सहाय्यक पोलीस निरीक्षक असलेल्या एका महिलेची फसवणूक करुन पळून गेलेल्या वॉण्टेड आरोपीस एक वर्षांनी एमएचबी पोलिसांनी अटक केली. संजय नामदेव पगारे असे या आरोपीचे नाव असून त्याच्यावर घरासाठी जागा देण्यासाठी घेतलेल्या पैशांचा अपहार केल्याचा आरोप आहे. पैसे घेऊन जागा न देता उलट या अधिकारी महिलेला त्याच्यासह त्याच्या पत्नीने धमकी दिली होती.
बोरिवलीतील योगीनगर, पोलीस वसाहतीत तक्रारदार महिला राहत असून मे 2022 साली ती बोरिवली वाहतूक विभागात सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत होती. त्या मूळच्या नाशिकच्या रहिवाशी असून त्यांना त्यांच्या गावी एक घर बांधायचे होते. त्यासाठी त्यांना घरासाठी जागेची गरज होती. याच दरम्यान त्यांच्या परिचित विधानभवन येथे कक्ष अधिकारी असलेल्या मामाने तिची संजय पगारे याच्याशी ओळख करुन दिली होती.संजय हा नाशिकच्या नाशिक-पुणे हायवे, रामनगर बिटको सिग्नलजवळील रहिवाशी होता. जुलै 2020 रोजी त्यांच्यात भेट होऊन त्याने तिला घरासाठी जागा मिळवून देतो असे आश्वासन दिले होते. याच जागेसाठी तिने त्याला दोन लाख रुपये दिले होते. ही रक्कम तिने तिच्या परिचित नातेवाईक, मित्रमंडळीसह पोलीस सोसायटीमधून कर्ज घेऊन दिली होती. मात्र दिलेल्या मुदतीत संजयने तिला घरासाठी जागा दिली नाही किंवा घरासाठी घेतलेले पैसेही परत केले नाही. वारंवार विचारणा करुनही तो तिला टाळत होता.
या तक्रारीनंतर गुन्हा दाखल होताच संजय हा गेल्या एक वर्षांपासून फरार होता. अखेर त्याला पोलिसांच्या एका विशेष पथकाने तीन दिवसांपूर्वी अटक केली. याच गुन्ह्यांत तो पोलीस कोठडीत होता. त्याने अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केले आहे का याचा पोलीस तपास करत आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.