भरउन्हात पाय पोळले आणि शिवरायांना हार न घालताच भाजप मंत्री पळाले
हिंगोली महराष्ट्राच्या हिंगोली जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वसमत शहरात शिवरायांच्या पुतळ्याला हार न घालता भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी पळ काढल्याचे दिसून आले. आता यावरून राज्यातील राजकारण तापणार असलण्याची चिन्हे आहे. शिवरायांना हार न घालता फेकून दिल्याने छत्रपती शिवाजी महाराजाचाअपमान झाल्याचा आरोप शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश देशमुख यांनी केला आहे.
श्रम, रोजगार पर्यावरण आणि जलवायू परिवर्तन केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव हे हिंगोली जिल्ह्याच्य दौऱ्यावर होते. वसमत शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालण्यासाठी गेले असता त्यांना उन्हाचे चटके बसले, पाय पोळले म्हणून चक्क केंद्रीय मंत्र्यांनी हार जागीच फेकून तेथून पळ काढला. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. भाजपचे मंत्री भूपेंद्र यादव यांच्या वर्तनाचा उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे जिल्हाप्रमुख संदेश देशमुख यांनी जाहीर निषेध केल आहे. शिवरायांना हार न घालता फेकून दिल्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झाल्याचा आरोपही संदेश देशमुख यांनी केला आहे.
काय आहे प्रकरण?
भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना हार न घालता हार फेकून देत पळ काढल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. भाजपवाले पोटात एक आणि ओठात एक दाखवत असतात आणि छत्रपती शिवरायांच नाव घेऊन राजकारण करतात, असा आरोप जिल्हाप्रमुख देशमुख यांनी केला आहे.
साहेब हार घाला, हार घाला....
छत्रपती शिवाजी महाराजांना साहेब हार घाला, हार घाला असे कार्यकर्ते म्हणत असून देखील मंत्री भूपेंद्र यादव यांनी हार तिथेच फेकून पळ काढला. याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. सध्या बसत असलेले उन्हाचे चटके भाजपचे मंत्री भूपेंद्र यादव यांना बसलेत हार जागीच टाकून देत मंत्राने पळ काढला, हा हार फेकून दिल्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला, असे म्हणत शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश देशमुख यांनी जाहीर निषेध केला आहे. शेवटी मंत्री साहेबांनी पळ काढण्याने अखेर कार्यकर्त्यांनी शिवरायांना हार अर्पण केला, अशी माहिती संदेश देशमुख यांनी दिली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.