टायटॅनिकचे अवशेष बघायला गेलेली पाणबुडी हरवली; शोधमोहिम सुरू
टायटॅनिक या जहाजाबद्दलचे आकर्षण आणि उत्सुकता आजही सर्वांना आहे. या घटनेवर आधारित टायटॅनिक हा हॉलिवूडपटही खूप लोकप्रिय आहे. टायटॅनिक हे त्या काळातलं सर्वात आधुनिक आणि मोठं जहाज होतं, जे आटलांटिंक महासागरात बुडालं. पाण्याखाली तब्बल 3800 मीटर खोल हे जहाज आहे असे सांगितले जाते. हे जहाज बुडालं असलं तरी त्याबद्दल सगळ्यांना खूप कुतूहल आहे. त्यामुळे याचे अवशेष पाहण्यासाठी पर्टक जात असतात.
टायटॅनिकचे अवशेष पाहण्यासाठी पर्यटकांना घेऊन गेलेली टुरिस्ट पाणबुडी अटलांटिक महासागरात बेपत्ता झाली आहे. रविवारपासून या पाणबुडीचा संपर्क तुटला आहे. फक्त 70 तास पुरेल इतकाच ऑक्सिजन पाणबुडीमध्ये शिल्लक आहे. या पाणबुडीमध्ये पायलट आणि चार पर्यटक आहेत. या पर्यटकामध्ये ब्रिटनचे अब्जाधीश हामिश हार्डिंग यांचाही समावेश आहे. पाणबुडी बेपत्ता झाल्याचे समजताच अमेरिका आणि कॅनडा या दोन्ही देशाकडून शोधमोहिम राबवली जात आहे.
सोमवारी संध्याकाळपर्यंत पाणबुडीमध्ये 70 तास पुरेल इतकाच ऑक्सिजन शिल्लक असेल. त्यामुळे पाणबुडी शोधण्यासाठी खूप कमी वेळ आहे. शोधमोहिम वेगात सुरु आहे. पाणबुडीमध्ये पायलट आणि चार पर्यटक आहेत. या पर्यटकामध्ये ब्रिटनचे अब्जाधीश हामिश हार्डिंग यांचाही समावेश आहे. 58 वर्षीय हार्डिंग एक एक्सप्लोररदेखील आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी सोशल मीडियावरुन आपल्या पर्यटनाबाबतची माहिती दिली होती. अमेरिका आणि कॅनाडा यांच्याकडून सुरु असलेल्या शोधमोहित अद्याप काहीही माहिती मिळालेली नाही. दोन्ही देशाच्या रेस्क्यू टीम पाण्यात पाणबुडीचा शोध घेत आहेत.
कॅनडाच्या न्यूफाऊंडलँडमध्ये उत्तर अटलांटिकच्या तळाशी टायटॅनिकचे अवशेष आहेत. ते पाहण्यासाठी जाणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी आहे. टायटॅनिकचे अवशेष 3800 मीटर खोलवर आहेत. हे पर्यटन साधारण 8 दिवसांचं आहे. या 8 दिवसाच्या पर्यटन यात्रेचं तिकीट तब्बल अडीच लाख डॉलर म्हणजे 2 कोटी रुपये इतकं आहे.. ही यात्रा सेंट जोन्सच्या न्यूफाउंडलँडपासून सुरु होते. टायटॅनिक जहाज 1912 मध्ये समुद्रात बुडालं होते. हिमनगाला आदळल्यानंतर जहाजाचे दोन तुकडे झाले अन् समुद्रात बुडाले होते. त्या दुर्घटनेत 1500 जणांचा मृत्यू झाला. टायटॅनिक जहाजाचे अवशेष 1985 मध्ये सापडले होते. टायटॅनिकबाबत कुतुहल असल्याने अनेक पर्यटक याचे अवशेष बघण्यासाठी जातात. आताही ही पाणबुडी पर्यटकांना घेऊन गेली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.