भरधाव एक्सप्रेसमध्ये बलात्काराचा प्रयत्न, महिलेसह नातेवाईकाला गाडीतून फेकून दिले
उत्तर प्रदेशातील मुझफ्फरपूरहून गुजरातला जाणाऱ्या सुरत एक्स्प्रेसमध्ये एका महिलेवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दरम्यान बलात्कार करण्यात यश न आल्याने नराधमांनी त्या महिलेला आणि तिच्या नातेवाईकाला धावत्या ट्रेनमधून बाहेर फेकले. या घटनेत पीडिता व तिचा नातेवाईक जखमी झाला आहे. ही घटना 19 जून रोजी ग्वाल्हेर येथे रात्री 11.30 च्या सुमारास घडली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनूसार, हे प्रकरण ग्वाल्हेर बिलुआ दरम्यानच्या बदोरी रेल्वे मार्गावर घडले. 19 जून रोजी झारखंडमधील पलामू जिल्ह्यातील रहिवासी महिला मजूर असून ती तिच्या नातेवाईकासह सुरत एक्स्प्रेसमध्ये बसून लखनौहून गुजरातमधील सुरतला जात होती. दरम्यान ग्वाल्हेरहून या ट्रेनमध्ये पाच जण चढले. आणि हे सर्वजण त्या महिलेच्या पुढच्या सीटवर बसले होते. काही वेळाने आरोपीने महिलेला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
पीडितेने बिलौआ पोलीसांना सांगितले की, आरोपी तिचे फोटो काढत होते. तिने त्यांना विरोध केला असता आरोपींनी तीला व तिच्या नातेवाईकाला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांना कंटाळून महिला आणि तिचे नातेवाईक ट्रेनमधील दरनवाजाजवळ जाऊन उभे राहिले. आरोपीने तेथे पोहोचून महिलेवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. एवढेच नाही तर, ग्वाल्हेर बिलुआ दरम्यानच्या बदोरी रेल्वे मार्गावर महिला आणि तिच्या सोबत असलेल्या नातेवाईकाला धावत्या ट्रेनमधून खाली फेकण्यात आले.
अर्धनग्न अवस्थेत असलेली महिला व तिचा नातेवाईक रात्रभर रेल्वे रुळाच्या बाजूला जखमी अवस्थेत पडून होते. ग्रामस्थांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी सकाळी घटनास्थळी धाव घेत दोघांनाही रुग्णालयात नेले. त्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल होत त्यांनी अज्ञात नरधमांचा शोध सुरू केला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.