Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मारहाण व ॲट्रॉसिटी प्रकरणात फिर्यादीने न्यायालयामध्ये खोटी साक्ष दिल्याबद्दल शासनाचे अर्थ सहाय्य परत करण्याचे न्यायालयाचे आदेश

मारहाण व ॲट्रॉसिटी प्रकरणात फिर्यादीने न्यायालयामध्ये खोटी साक्ष दिल्याबद्दल शासनाचे अर्थ सहाय्य परत करण्याचे न्यायालयाचे आदेश 


सांगली:  मारहाण व ॲट्रॉसिटी प्रकरणात फिर्यादीने न्यायालयामध्ये खोटी साक्ष दिल्याबद्दल प्रदीप विक्रम रास्ते (वय.२३ रा. बलगवडे ता. तासगाव) याच्यावर कारवाई करण्याचे व त्याने शासनाकडून घेतलेले दीड लाख रुपये वसूल करण्याचे आदेश जिल्हा सत्र न्यायाधीश श्रीमती एम. एम. पाटील यांनी सुनावली. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील ॲड. रियाज जमादार यांनी काम पाहिले.

दिनांक २६ सप्टेंबर २०२० रोजी प्रदीप विक्रम रास्ते यांने तासगाव पोलिस ठाण्यामध्ये फिर्याद दिली होती. गावातील सौरभ रावसाहेब शिंदे यानी जातीवाचक शिवीगाळ करून, लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. प्रदीप यांच्या पत्नी मारामारी सोडवण्यास गेल्या असता त्यांना देखील सौरभ शिंदे यांनी जातीवाचक शिवीगाळ करून ढकलून दिले अशी तक्रार प्रदीप रास्ते यांने त्यांच्या फिर्यादीमध्ये केली होती. त्यानंतर प्रदीप रस्ते याने समाज कल्याण विभागाकडून दीड लाखांची मदत मिळवली होती.

न्यायालयामध्ये उलट तपासा दरम्यान प्रदीप रस्ते फितूर झाले. रास्ते यांने सौरभ यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले. सौरभ यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने रागाने सौरभ यांच्या विरोधात प्रदीप रस्ते यांने खोटी फिर्याद दिल्याची साक्ष  प्रदीप रस्ते यांनी उलट तपासा दरम्यान दिली.

सरकारी वकील रियाज जमादार यांनी या प्रकाराला जोरदार विरोध करत रास्ते याला फितूर जाहीर करून त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी न्यायालयाकडे केली. प्रदीप रास्ते सारख्या फितूर साक्षीदारामुळे शिक्षेचे प्रमाण कमी होते व पर्यायाने समाजामध्ये कायद्याचा धाक राहत नाही म्हणून त्याला जास्तीत जास्त शिक्षा करावी असा युक्तिवाद जमादार यांनी न्यायालयापुढे केला.

न्यायालयाने रास्ते याला फितूर जाहीर करत फौजदारी संहिता ३४० अन्वये त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे तसेच समाज कल्याण विभागाचे दीड लाख रुपये वसूल करण्याचे आदेश देण्यात आले. या कलमानुसार रास्ते याच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो तसेच त्याला सहा महिन्यापर्यंत शिक्षा होऊ शकते.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.