Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सव्वा लाखाची लाच घेताना प्रभारी अग्नीशमन अधिकाऱ्यास अटकसांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

सव्वा लाखाची लाच घेताना प्रभारी अग्नीशमन अधिकाऱ्यास अटकसांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई


सांगली : ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी सव्वा लाखांची लाच घेताना सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या प्रभारी अग्नीशमन अधिकाऱ्यास रंगेहात पकडण्यात आले. मंगळवारी सायंकाळी सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. याबाबत रात्री उशीरा पर्यंत सांगली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. 

विजय आनंदराव पवार (वय ५०) असे लाच घेणाऱ्या अग्नीशमन अधिकाऱ्याचे नाव आहे. तक्रारदाराने यांनी अग्नीशमन विभागाकडे ना हरकत दाखल्याची मागणी केली होती. दाखला देण्याच्या बदल्यात पवार यांनी त्याच्याकडे सव्वा लाख रूपयांच्या लाचेची मागणी केली. त्यानंतर याबाबत तक्रारदाराने सांगलीतील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.   

त्या तक्रारीची पडताळणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली. त्यामध्ये पवार याने लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर मंगळवारी सायंकाळी तक्रारदाराकडून सव्वा लाख रूपयांची लाच स्विकारताना पवार यांना रंगेहात पकडण्यात आले. याबाबत पवार यांच्याविरोधात सांगली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.  

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक संदीप पाटील यांच्या मागर्दशर्नाखाली निरीक्षक दत्तात्रय पुजारी, विनायक भिलारे, प्रीतम चौगुले, ऋषिकेश बडणीकर, अजित पाटील, सलीम मकानदार, सुदशर्न पाटील, रविंद्र धुमाळ, पोपट पाटील, सीमा माने, उमेश जाधव, रामहरी वाघमोडे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.