बनावट कागदपत्रांद्वारे विवाह प्रमाणपत्र बनवून बदनामी वाळव्याच्या गुंडाला आष्टा पोलिसांचे अभय!
सांगली: वाळवा येथील गुंड तौसिफ शेख याने माझ्या संमतीशिवाय शाळेतून माझे बोनाफाईड प्रमाणपत्र, फोटो उपलब्ध करून विवाह नोंदणीचे प्रमाणपत्र बनवले आहे. हा तौसिफ शेख पोलिसांच्या रेकॅडर्वरील गुन्हेगार असून त्याने बंदूक तसेच अन्य घातक शस्त्रांचा धाक दाखवून माझे तसेच माझ्या वडिलांचे अपहरणही केले होते. त्याच्यापासून आमच्या संपूणर् कुटुंबाच्या जीवाला धोका आहे. याप्रकरणी गेल्या महिन्यात आष्टा पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. मात्र तेथील अधिकारी सिद आणि पडळकर यांनी आमची कोणतीही दखल घेतली नाही असा आरोप पीडित तरूणीने सांगलीत माध्यमांशी बोलताना केला आहे.
पीडित तरूणी म्हणाली, मी एका महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. माझ्या आई-वडिलांसह वाळवा येथे राहण्यास आहे. गेल्या काही महिन्यांपासून गुंड तौसिफ शेख मला आणि माझ्या कुटुंबाला लग्नासाठी त्रास देत आहे. त्याने फेब्रुवारी महिन्यात मोबाईलवर मेसेजही केला होता. मात्र मी त्याला कसलीही प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर त्याने माझ्या संमतीशिवाय शाळेतून माझे बोनाफाईड प्रमाणपत्र मिळवले. शिवाय मी ज्या फोटो स्टुडिओत महाविद्यालयीन कामासाठी फोटो काढले होते. तेथून त्याने माझा फोटोही मिळवला. माझ्या सहीची नक्कल करून तसेच इस्लामपूर येथील एका मौलानाकडून आमचे लग्न झाल्याचे पत्र घेतले.
ती म्हणाली, माझ्या संमतीशिवाय मिळवलेल्या या कागदपत्रांद्वारे तसेच मौलाना यांच्या साक्षीने त्याचा आणि माझा विवाह झाल्याचे नोंदणी प्रमाणपत्र मिळवले आहे. ते प्रमाणपत्र तो वाळवा गावात सवार्ना दाखवून आमचे लग्न झाल्याचे सांगून माझी आणि माझ्या कुटुंबाची बदनामी करत आहे. त्याच्यामुळे मला लग्नासाठी आलेली स्थळेही परत गेली आहेत. गुंड तौसिफ शेख याचा त्रास असह्य झाल्याने मी याबाबत गेल्या महिन्यात आष्टा पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्याची दखल घेतली नाही. त्यानंतर सांगलीतील वरीष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना भेटल्यानंतर माझी तक्रार घेण्यात आली होती. मात्र त्यामध्ये गुंड शेख याने बंदूक तसेच अन्य हत्यारांचा धाक दाखवल्याचा उल्लेख मुद्दाम वगळण्यात आला. त्याशिवाय माझे आणि माझ्या वडिलांचे अपहरण केल्याचाही उल्लेख माझ्या तसेच माझ्या कुटुंबियांच्या जबाबात घेतला नाही. त्यामुळे गुंड तौसिफ शेख याला पाठिशी घालणारे आष्टा पोलिस ठाण्यातील अधिकारी श्री. सिद आणि तपासअधिकारी पडळकर यांच्यावर कारवाई करावी अशी मागणीही पीडित तरूणीने यावेळी केली. आष्टा पोलिसांकडून न्याय न मिळाल्यास मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे दाद माग असल्याचे त्या तरूणीने यावेळी सांगितले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.