Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

राज्यातील ' या ' अधिकाऱ्यांना आएएस दर्जा बहाल

राज्यातील ' या ' अधिकाऱ्यांना आएएस दर्जा बहाल 



लोकसेवा आयोगामार्फत निवड होत राजपत्रित अधिकारी होण्याचे प्रत्येक होतकरू सुशिक्षीत तरूणाचे ध्येय असते आणि निवड झाल्यावर कधीतरी सनदी अधिकाऱ्याचा दर्जा मिळावा, अशी सुप्त ईच्छा तो बाळगून असतात. मात्र निवडकांनाच अशी संधी प्राप्त होते. अशीच संधी आता राज्यातील काही अधिकाऱ्यांना मिळाली आहे. तसे नोटिफिकेशन केंद्र सरकारच्या विनंतीने राष्ट्रपती भवनातून निघाले आहे.

राज्यातील खालील अधिकाऱ्यांना आता आयएएस अधिकाऱ्याचा दर्जा बहाल होणार आहे. जी.एम.गढीकर, पी.बी.खपले, ए.पी.पाठक, जी.आर.खरात, डॉ.पी.पी.देवरे, एम.डब्लू.साळवे, एम.पी.देशमुख, डॉ.बी.एन.बस्तेवाड. यांना १ जानेवारी २०२१ ते ३१ डिसेंबर २०२१ या दरम्यान रिक्त झालेल्या जागांवर नियूक्ती मिळेल. 

तर १ जानेवारी २०२२ ते ३१ डिसेंबर २०२२ या दरम्यान रिक्त झालेल्या जागांवर सतिशकुमार दत्तात्रय खडके, संजय श्रीपतराव काटकर, डॉ.माधव नामदेव कुसेकर, पराग सुरेश सोमण, अनिलकुमार खंडेराव पवार, सचिन बंडोपंत कलंत्रे, श्रीधर बापुराव दुबे, विकास मारोती पानसरे व मनोज विजय रानडे यांना आयएएसच्या दर्जा बहाल करीत नियूक्ती मिळेल. प्रामुख्याने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून यांना नियूक्ती मिळण्याची शक्यता आहे. वर्धा येथे जात पडताळणी अधिकारी म्हणून कार्यरत जी.एम.गढीकर यांचाही यास समावेश झाला आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.