Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

गोदावरी नदीपात्रात अधिकार्‍यांना चिरडून टाकण्याचा प्रयत्न , पोलीसांकडून हवेत गोळीबार

गोदावरी नदीपात्रात अधिकार्‍यांना चिरडून टाकण्याचा प्रयत्न ,  पोलीसांकडून हवेत गोळीबार 


रामपूर (जि. अहमदनगर) : गोदावरी नदीपात्रात सोमवारी मध्यरात्री अडीच वाजेच्या दरम्यान वाळू तस्करांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या जिल्हा गौण खनिज अधिकारी व पोलिस पथकाला वाहनांखाली चिरडण्याचा प्रयत्न करण्यात आला. वाळू तस्करांचा मोठा जमाव पथकावर चालून आला. यावेळी पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी हवेत गोळीबार केला. त्यामुळे अनुचित प्रकार टळला.

श्रीरामपूर पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाळू तस्करांची सात वाहने पथकाने ताब्यात घेतली आहेत. तालुक्यातील गोवर्धनपूर येथे सरकारने ६०० रुपये दराने नागरिकांना वाळू देण्यासाठी डेपो सुरू केला आहे. या डेपोपासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर गोदावरी नदीतून मोठ्या प्रमाणात वाळू तस्करी सुरू आहे.

याबाबत तक्रार करण्यात आली होती. वाळू तस्करीवर कारवाई करण्यासाठी जिल्हा गौण खनिज अधिकारी वसीम सय्यद, निरीक्षक भगवान कुलथे, पोलिस मुख्यालयातील पोलिस गणेश नाईक यांचे संयुक्त पथक नेमण्यात आले होते. या पथकाने गोवर्धनपूर येथील गोदावरी नदीपात्रात छापा टाकला असता तेथे ७ डंपर आढळून आले. या ठिकाणाहून ३५ लाख रुपयांची वाळू डंपरमध्ये भरली जात असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. 

पथकाने वाळू उपशास विरोध केला असता तेथे असणारे चालक, मालक व इतर असे मिळून ५० ते ६० जणांचा जमाव या पथकावर धावून गेला. तसेच काहींनी या पथकावर डंपर घाला असे सांगितले. त्यामुळे चालकांनी पथकाच्या दिशेनेडंपर चालविला. त्याचवेळी पथकातील पोलिस हवालदार बारवकर यांनी पथकाच्या संरक्षणासाठी हवेत गोळीबार केला. त्यामुळे वाहने सोडून सर्वांनी तेथून पळ काढला. त्यादरम्यान श्रीरामपूरचे तलसीलदार राजेंद्र वाघचौरे व पोलिस पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.