Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

रिलायन्सवरील दरोड्यातील सहा संशयित हैदराबाद येथून ताब्यात ?

रिलायन्सवरील दरोड्यातील सहा संशयित हैदराबाद येथून ताब्यात ?



सांगली रिलायन्स ज्वेलर्सवर पडलेल्या दरोडयाप्रकरणी ६ संशयितांना हैदराबाद येथून ताब्यात घेण्यात आल्याचे वृत्त आहे. दरम्यान आरोपींची रेखाचित्रे पोलिसांनी प्रसिध्द करून नागरिकांना आवाहन केले आहे. आरोपींची रेखाचित्रे पोलिसांनी सांगली मिरज रस्त्यावरील रिलायन्स ज्वेलर्स येथे झालेल्या दरोडे प्रकरणी चार संशयित दरोडेखोरांची रेखाचित्र तयार केले असून ज्यांना यांच्या बद्दल माहिती मिळाली असेल त्याने संपर्क पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांनी केले. 

या दरोड्यात १४ कोटींच्या सोने डायमंड लूट आणि ६७ हजाराची दरोड्याखोरांकडून लूट करण्यात आली होती. पोलिसांनी आतापर्यंत दरोडेखोरांनी वापरलेली कार जत केली आहे. आज या केली आहे. आज या कारमधील वस्तूची कोल्हापूरच्या टीमकडून फॉरेन्सिक लॅबकडून नमुने घेण्यात आले. याचबरोबर आज यातील चार संशयितांची रेखाचित्र पोलिसांकडून जाहीर करण्यात आली.

संशयितांची माहिती मिळाल्यास संपर्क साधण्याचे पोलिसांचे आवाहन.

या रेखा चित्रातील संशयतांची माहिती कोणास असेल तर पोलिसांशी संपर्क साधावा त्यांची नावे गोपनीय ठेवली जातीस, असे आवाहनही पोलीस उपाधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी केले आहे. दरम्यान, रिलायन्स दरोडा प्रकरणी सांगली पोलिसांनी हैदराबाद येथून सहा संशयित ताप्यात पेतल्याची माहिती आहे. लवकरच या संशयतांना सांगलीमध्ये आणले जाण्याची शक्यता आहे.

दरोडा टाकल्यानंतर गुन्ह्यात वापरलेले चारचाकी सफारी वाहन भोसे गावातील शेतात टाकून दरोडेखोर फरार झाले होते. दोन रिवाल्वरही पोलिसांनी जप्त केले. दरोडेखोरांची महत्वाची कागदपत्रेही पोलिसांच्या हाती लागली आहेत. भोसे वस्ती येथील संजय चव्हाण यांच्या शेताच्या बांधावर गाडी आढळून आली होती. या ठिकाणी मिरज उपविभागीय पोलीस अधीक्षक प्रणील गिल्डा, मिरज ग्रामीण पोलीस निरीक्षक नारायण देशमुख, एलसीबी पथक, जिल्हयातील पोलीस फौजफाटा तात्काळ दाखल झाला होता. पोलिसांनी या गाडीची तपासणी केली.

दरम्यान रिलायन्स ज्वेल्सवर दरोडा टाकून दरोडेखोरांनी पलायन केले. दरोड्याच्या या घटनेने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. सांगलीचे आम गाडगीळ तसेच जिल्ह्याचे पालक- मंत्री नाम. खाडे यांनी दरोडयाच्या या गंभीर घटनेची दखल घेऊन ते उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर सगळा प्रकार घतला पोलिसांबद्दलची नागरिकामध्ये असलेली नाराजी फडणवीस यांच्या कानावर घालण्यात आली. त्यामुळे पोलिस यंत्रणा युध्दपातळीवर अक्षरशः पळून खेळू लागली आहे. आज यातील चार संशयितांची रेखाचित्र पोलिसांकडून जाहीर करण्यात आली. साधावा असे आव्हान उपविभागीय दरोडेखोरांच्या शोधासह अटकेसाठी अनेक पथके विविध राज्यात रवाना करण्यात आली. 

त्यातील हैदराबाद येथे गेलेल्या पथकाला बन्यापैकी यश मिळाल्याचे वृत्त आहे. सहा संशयि तांना पोलिस पथकाने ताब्यात घेतल्याचे वृत आहे. संशयितांना घेऊन पोलिस पथक सांगलीच्या दिशेने परतीच्या वाट्यावर अस त्याचे वृत्त आहे. मात्र या कारवाई बायत पोलिस यंत्रणेनी कमालीची गोपनियता बाळगली आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.