Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कोल्हापूर परिक्षेत्रातील १२ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या; सुनील फुलारी यांचे आदेश

कोल्हापूर परिक्षेत्रातील १२ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या; सुनील फुलारी यांचे आदेश



कोल्हापूर : कोल्हापूर परिक्षेत्रातील १२ पोलिस निरीक्षकांच्या शुक्रवारी बदल्या करण्यात आल्या आहेत. तर ११ अधिकाऱ्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे. बदली झालेल्यांमध्ये सांगलीतील दोन, कोल्हापुरातील तीन, सोलापूर ग्रामीणमधील तीन, पुणे ग्रामीणमधील चार अधिकाऱ्यांचा समावेश आहे. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी याबाबतचे आदेश शुक्रवारी रात्री दिले आहेत. 

कोल्हापूर येथील शशिकांत पाटोळे, श्रीकृष्ण कटकधोंड यांची सांगलीला तर कोंडीराम पाटील यांची सातारा येथे बदली करण्यात आली आहे. सांगलीतील भानुदास निंभोरे यांची सोलापूर ग्रामीणला तर राजेंद्र सावंत्रे यांची कोल्हापूर येथे बदली करण्यात आली आहे. सोलापूर ग्रामीणकडील सुहास जगताप, सूयर्कांत कोकणे यांची पुणे ग्रामीणकडे, अरूण सुगावकर यांची सांगलीकडे बदली करण्यात आली आहे. पुणे ग्रामीणकडील सुनील महाडिक यांची सातारा येथे, तयूब मुजावर यांची सोलापूर ग्रामीणकडे, प्रवीण खानापुरे यांची कोल्हापूर येथे, सुरेशकुमार राऊत यांची सोलापूर ग्रामीणकडे बदली करण्यात आली आहे.  

कोल्हापूर येथील तानाजी सावंत, जयसिंह रिसवडकर, ईश्वर ओमासे, प्रकाश गायकवाड, राजेंद्र मस्के, सांगलीतील शिवाजीराव गायकवाड, नारायण देशमुख, सातारा येथील संदीप भागवत, पुणे ग्रामीणकडील यशवंत नलवडे, आण्णासाहेब घोलप, भाऊसाहेब पाटील या अधिकाऱ्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.