Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

जे जे हॉस्पिटलचे राजीनामा नाट्य!; कारवाई शिवाय संप मागे नाही; मार्डचा इशारा

जे जे हॉस्पिटलचे राजीनामा नाट्य!; कारवाई शिवाय संप मागे नाही; मार्डचा इशारा


कारवाईशिवाय संप मागे घेणार नाही; मार्डचा इशारा दरम्यान, बुधवारी सायंकाळपासूनच जे. जे. रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी बेमुदत संप पुकारला. डॉ. लहाने आणि त्यांच्या टीमविरुद्ध कारवाई होत नाही तोपर्यंत संप मागे घेणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे. संप करण्यासाठी आम्हाला कुणीही भडकावले नसून हा निर्णय आमचा स्वतः चा आहे, असे त्यांनी सांगितले. राजीनामा देणाऱ्या डॉक्टरांमध्ये अनेक डॉक्टर्स हे कॉण्ट्रॅक्टवर असून ते आठवड्यातील फक्त दोन-तीन दिवस काही तासांसाठी येतात. त्यांचा शैक्षणिकदृष्ट्या विद्यार्थ्यांना काहीच उपयोग नाही, असा संपकरी डॉक्टरांचा दावा आहे.

पारदर्शक चौकशी करून अहवाल दिला निवासी डॉक्टरांनी केलेल्या प्रत्येक तक्रारीची आम्ही पारदर्शक चौकशी केली. त्यानंतर चौकशीचा अहवाल अधिष्ठातांना सादर केला आहे. कोणताही आकस न ठेवता निःपक्षपातीपणे ही चौकशी झाली आहे. एकेक मुद्दा बारकाईने तपासून, नियमांच्या आधारेच अहवाल बनवला गेला आहे. 

  • डॉ. अशोक आनंद, चौकशी समिती अध्यक्ष

राजीनाम्याबद्दल निर्णय घेण्याचा अधिकार सचिवांना

चौकशी समितीचा अहवाल माझ्याकडे आला. त्यानुसार आता आम्ही वैद्यकीय शिक्षण सचिवांना अभिप्राय कळवणार आहोत. साडेसातशे निवासी डॉक्टर्स संपावर आहेत. संप मागे घेण्याचे आवाहन आम्ही केले आहे. पण संप सुरू राहिला तर रुग्ण महापालिका रुग्णालयांमध्ये स्थानांतरित करावे लागतील. डॉ. लहाने, डॉ. पारेख आणि टीमने दिलेले राजीनामे आज दुपारी माझ्याकडे आले. ते विहित नमुन्यात नाहीत. त्या राजीनाम्यांवर निर्णय घेण्याचे अधिकार अधिष्ठातांना नाहीत तर सचिवांना आहेत.

  •  डॉ. पल्लवी सापळे, अधिष्ठाता, सर जे. जे. रुग्णालय


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.