Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पत्नीशी झालेल्या भांडणातून पतीने भाड्याचे अख्खे घरच दिले पेटवून

पत्नीशी झालेल्या भांडणातून पतीने भाड्याचे अख्खे घरच दिले पेटवून


सांगली : पत्नीशी झालेल्या किरकोळ वादातून पतीने चक्क घरच पेटवून दिल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री घडली. जिल्ह्यातील कवठेमहांकाळ येथील सगरे मळ्यात हा प्रकार घडला. दरम्यान पतीने भाड्याने रहात असलेले संपूर्ण घरच पेटवून दिल्याने यामध्ये एक लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी एकाविरोधात कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

रूक्मानंद नामदेव चंदनशिवे (रा. सगरे मळा, कवठेमहांकाळ, मूळ रा. अंकले, ता. जत) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी घराचे मालक प्रफुल्ल प्रभाकर   कुलकर्णी (वय ४५, रा. कवठेमहांकाळ) यांनी फियार्द दिली आहे.   कुलकर्णी  यांच्या शेतातील शेती अवजारे ठेवलेल्या शेडजवळ चंदनशिवे कुटुंब भाड्याच्या घरात रहात होते. बुधवारी रात्री चंदनशिवे आणि त्याच्या पत्नीमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. 

त्यानंतर गुरुवारी मध्यरात्री पत्नीशी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून चंदनशिवे याने त्याचे रहात असलेले अख्खे घरच पेटवून दिले. त्यानंतर त्याने कुलकर्णी यांचे शेती अवजारे असलेले शेडही पेटवून दिले. यामध्ये अवजारांसह अन्य वस्तू जळून खाक झाल्या आहेत. यामध्ये कुलकर्णी यांचे एक लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. हा प्रकार लक्षात आल्यानंतर गुरुवारी सकाळी  कुलकर्णी यांनी कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात फियार्द दिली आहे. त्यानुसार चंदनशिवे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.