Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

महाविकास आघाडीत सांगली जिल्ह्यात होणार बिघाडी?

महाविकास आघाडीत सांगली जिल्ह्यात होणार बिघाडी?
 

सांगली: कोट्यावधी रुपयांचा चुराडा करून काँग्रेसने महानिर्धार मेळावा घेत सांगलीच्या राजकारणात काँग्रेसच यापुढे अग्रेसर राहील असा प्रयत्न केला आणि आमच्यात मतभेद नाहीत याचा प्रत्यय आणून दिला पण महाविकास आघाडीतील घटक पक्ष असणाऱ्या राष्ट्रवादीच काँग्रेसच्या या  निर्धारला  खो घालणार हे आता स्पष्ट झाले आहे. कारण सांगली लोकसभा आणि सांगली विधानसभेची जागाही राष्ट्रवादीतर्फे लढविण्याची तयारी दस्तूरखुद्द प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी चालवली आहे.

सांगली लोकसभेची आणि विधानसभेची जागा महाविकास आघाडीत काँग्रेसच्या वाट्याला आहे. परंतु दोन्ही वेळा या दोन्ही मतदारसंघात काँग्रेसला पराभव पत्करावा लागला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जिल्ह्याचे नेते जयंत पाटील यांनी लोकसभा आणि सांगली विधानसभा जागेवर आपला उमेदवार उभा करण्याचा मनसुबा आखला आहे. शिवाय सांगली लोकसभेसाठी आपले चिरंजीव प्रतीक जयंत पाटील यांना उमेदवार म्हणून उभे करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. 

तर सांगली विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीतर्फे  सक्षम उमेदवार देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यामुळे काँग्रेसच्या या निर्धारलाआता मित्रपक्ष असणाऱ्या राष्ट्रवादीच खो घालणार आहे. त्यामुळे जिल्ह्याचे राजकारण वेगळ्याच वळणावर जाणार?   अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.

सांगली जिल्ह्याच्या राजकारणावर केवळ आपलेच वर्चस्व रहावे या दृष्टीने जयंत पाटील यांनी व्यूहरचना आखली आहे आणि त्याची अंमलबजावणी २०२४ लोकसभा विधानसभा  निवडणुकीत ते करणार आहेत .त्यामुळे घटक पक्षाचा विचार न करता सांगली जिल्ह्यात ही राजकीय खेळी केली जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोरदारपणे सुरू आहे.

जिल्हा नेते म्हणून काँग्रेसचे डॉ.विश्वजीत कदम पुढे येत असतानाच जयंत पाटील यांनी योग्यवेळ साधून नवी राजकीय खेळी खेळण्याचा डाव मांडला आहे. त्यामुळे जिल्ह्याचा नेता कोण? हा ही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होणार आहे. पक्षी संघटन आणि जिल्ह्याचे नेतृत्व या दोन्ही गोष्टी वेगळ्या असल्या तरी सांगलीच्या राजकारणात केवळ आपलेच वर्चस्व आहे हे सिद्ध करण्यासाठीच जयंत पाटील यांनी ही नवी राजकीय खेळी खेळण्याचा डाव मांडला आहे.

कोट्यावधी रुपये खर्च करून कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामया यांचा सत्कार काँग्रेसचे डॉ. विश्वजीत कदम यांनी सांगलीत केला. मात्र या कार्यक्रमात केवळ गोंधळ दिसला. योग्य नियोजनाचा अभाव आणि ठोस कोणतेही आश्वासन मिळाले नाही.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.