आधी काडी लावली अन् स्वतःला पेटवणार तेवढ्यात.....
सागंली : आपलं स्वत:चं घर वाचवण्यासाठी जीवाचं रान करणाऱ्या एका वृद्ध महिलेचा व्हिडीओ समोर आला आहे. हृदयपिळवटून टाकणारा हा व्हिडीओे आहे. सांगलीच्या मिरज-मालगांव रोडवर अतिक्रमण हटविण्यासाठी गेलेल्या पथकासमोरच वृद्धेने आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
खोतनगर येथील सुमन मनोहर वाघमारे, सुरेश मनोहर वाघमारे यांनी महापालिकेच्या सार्वजनिक रस्त्यावर अतिक्रमण करून पुर्ण रस्ताच बंद केला असल्याबाबत मिरज सुधार समिती गेल्या दिड वर्षापासून महापालिकेकडे पाठपुरावा करत आहे. याबाबत सुधार समितीने ३१ मेपासून बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर आयुक्त सुनील पवार, उपायुक्त स्मृती पाटील यांनी सदर रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार काल अतिक्रमण विरोधी पथकाचे अधिकारी व कर्मचारी अतिक्रमण हटविण्यास गेले असता, सुमन वाघमारे हिने अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला.
वेळीच महापालिकेच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी सावधानता बाळगत आग विझवली. तर याबाबत महापालिकेने त्यांच्या विरोधात शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी मिरज शहर पोलिसांत गुन्हा दाखल केला असल्याची माहिती सहायक आयुक्त अशोक कुंभार यांनी दिली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.