पंढरपूरला या पण राजकारण करू नका; फडणवीस यांचा केसीआर याना टोला
उपमुख्यमंत्री फडणवीस आज गुरुवारी कऱ्हाडच्या (जि.सातारा) दौऱ्यावर होते. त्या दरम्यान त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी खासदार उदयनराजे भोसले आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार जयकुमार गोरे, भाजपचे सातारा लोकसभा प्रभारी अतुल भोसले आदी उपस्थित होते.तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर रावसंपूर्ण मंत्रीमंडळ घेवुन पंढरपुरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री फडणवीस यांना पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले, कोणालाही पंढरपुरला येता येईल. तेथे सर्वांचे स्वागत आहे. मात्र, राजकारणासाठी कोणी येवु नये. भक्तीभावाने तेथे आले पाहिजे. त्या भावनेने तेथे कोणीही येत असेल तर त्यांचे तेथे स्वागतच आहे, असा टोला लगावला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.