पतीने विकत घेतलेल्या संपत्तीत पत्नीचा समान वाटा ; मद्रास उच्च न्यायालयालयाचा महत्वपूर्ण निर्णय
कुटुंबाची काळजी घेणे ही 8 तासांची नोकरी नाही तर 24 तासांची जबाबदारी आहे. घर सांभाळून कौटुंबिक संपत्ती निर्माण करण्यात आणि खरेदी करण्यात तिने अप्रत्यक्षपणे हातभार लावलेला असतो. यामुळे पतीने स्वतःच्या नावावर खरेदी केलेल्या मालमत्तेवर पत्नीचाही सारखाच हक्क आहे, असा महत्त्वपूर्ण निकाल मद्रास उच्च न्यायालयाने दिला आहे. न्यायमूर्ती कृष्णन रामासामी यांनी हा निर्णय दिला. पत्नीच्या योगदानाला मान्यता देणारा कोणताही कायदा नसला तरी न्यायालय त्याला मान्यता देऊ शकते, असेही रामासामी यांनी स्पष्ट केले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.