अबब या गायकाने चक्क फ्रिज मध्ये ठेवले नोटांचे बंडल !
नवी दिल्ली: कोण कधी काय करेल याचा काही नेम नसतो. त्यामुळे जगात असे अनेक लोक आहेत जे अशी कामं करतात ज्याचा कधी कोणी विचारही केला नसेल. सोशल मीडियावर तर अशा घटना कायमच चर्चेत असतात. विचित्र, मजेशीर, हटके, धोकादायक, आश्चर्यकारक, अशा गोष्टी सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असतात. नुकतीच एक आश्चर्यकारक गोष्ट समोर आली आहे. एका व्यक्तीने चक्क फ्रीजमध्ये पैसै ठेवले होते. आता त्याला त्याचा पश्चाताप होत आहे.
हे प्रकरण नेमकं काय आहे याविषयी जाणून घेऊया. एका गायकाने नुकताच त्याच्या घरातील फ्रिजमधील व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. त्याच्या फ्रिजमध्ये खूप सारी रोकड होती. त्यानंतर सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली आणि त्याची खिल्ली उडवण्यास सुरुवात झाली.मलेशियाचा स्थानिक गायक आरिफ बहारन याने सोशल मीडिया साइटवर एक व्हिडिओ पोस्ट केला. यामध्ये त्यानी घरातील फ्रीज उघडताच आतमध्ये खाद्यपदार्थांऐवजी रोख रक्कम असल्याचं दाखवलं. सिंगरचा फ्रीज नोटांनी भरलेला होता. या छोट्या क्लिपमध्ये आरिफने फ्रीज उघडून नोटांचे बंडल दाखवले आणि त्यातून काही रोख रक्कम काढली.हे पैसे कॅमेऱ्यात दाखवल्यानंतर आरिफने ते परत फ्रीजमध्ये ठेवले. पण हा व्हिडीओ बनवणे आणि शेअर करणे गायकाला भोवलं. आरिफने व्हिडीओ शेअर करताच त्याची खिल्ली उडवली.आरिफला वाटले होते की या व्हिडीओमुळे त्याचे खूप कौतुक होईल. मात्र हे सर्व व्हिडिओ पाहताच नेटकऱ्यांनी आरिफची खिल्ली उडवायला सुरुवात केली.
सगळ्या ट्रोलर्सला आरिफने असं उत्तर दिलं की तो पैसे बँकेत ठेवतो. पण ही रोकड पाहिल्यानंतर त्याला आणखी पैसे कमवण्याची प्रेरणा मिळते. म्हणून तो काही पैसै फ्रिजमध्ये ठेवतो. दरम्यान, आरिफचा व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी त्यावर टिका टिपणी केली. ज्यामुळे आरिफ चांगलाच चर्चेत आला. सोशल मीडियावर कधी कोण काय शेअर करेल आणि त्याचा व्हिडीओ फोटो व्हायरल होईल कोणीही सांगू शकत नाही. त्यामुळे सोशल मीडियावर तुम्हाला निरनिराळे व्हिडीओ नक्कीच पहायला मिळतील.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.