तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली; आता या खात्याची जबाबदारी
गेल्या महिन्यात आयएसएस तुकाराम मुंढे यांची कृषी आणि पशुसंवर्धन विभागात अतिरिक्त सचिव म्हणून बदली करण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा त्यांची बदली करण्यात आली आहे.
गेल्या १८ वर्षांत त्यांच्या २१ बदल्या झाल्या आहेत.
राज्य सरकारने शुक्रवारी (ता. २ जून) वीस भारतीय प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या (आयएएस) बदल्या केल्या आहेत. यात तुकाराम मुंढे यांचाही समावेश आहे. त्यांची गेल्या महिन्यातच कृषी आणि पशुसंवर्धन विभागाचे अतिरिक्त सचिवपदी नियुक्ती करण्यात आली होती. आता मुंढे यांच्याकडे मराठी भाषा विभागाचे सचिव म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.महाविकास आघाडी सरकारच्या काळात मुंडे यांना मुख्य प्रवाहापासून दूर ठेवण्यात आले होते. राज्यात सत्तापालट झाल्यानंतर मुंडे यांना आरोग्य विभागातील महत्वाचे पद देण्यात आले होते. राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे व ग्रामीण रूग्णालयांची पाहणी सुरू करीत शिस्त लावण्याचा प्रयत्न केला.यावेळी काम करताना त्यांनी स्वत:च्या कामाच्या पद्धतीत काहीसा बदल केला. दरम्यान त्यांना अनेक गोष्टी लक्षात आल्यानंतर कोरोना काळातील खरेदीची चौकशी करण्याची तयारी सुरू केली. त्यानंतर त्यांची डिसेंबर २०२२ मध्ये मुंडे यांची उचलबांगडी करण्यात आली. डिसेंबर २०२२ नंतर त्यांना पोस्टिंग देण्यात आलेली नव्हती. त्यानंतर मे २०२३ मध्ये दहा ज्येष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यात तुकाराम मुंढे यांना पशुसंवर्धन आणि दुग्धविकास विभागाचे सचिव म्हणून नियुक्ती देण्यात आली होती.
आता या नियुक्तीला महिनाच पूर्ण झाला तोच मुंढे यांची पुन्हा बदली करण्यात आली आहे. आता त्यांच्याकडे मराठी भाषा विभागाचे सचिव म्हणून जबाबदारी दिली आहे. आता ते या विभागात किती काळ राहतात, याकडेच राज्याचे लक्ष असेल.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.