Breaking News

    Loading......

Sangli Darpan

Krushnakath News

शिक्षक पतसंस्थेच्या निवडणुकीत प्रहार शिक्षक संघटना निर्णायक राहणार - चंद्रशेखर क्षीरसागर

शिक्षक पतसंस्थेच्या निवडणुकीत प्रहार शिक्षक संघटना निर्णायक राहणार -  चंद्रशेखर क्षीरसागर


सांगली:  प्रहार संघटना ही समाजसेवक आणि मंत्री ना.श्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू  यांच्या नेतृत्वाखाली आणि राज्याध्यक्ष  संतोष राजगुरू यांच्या मार्गदर्शनात शिक्षक संघटना म्हणून राज्यात प्रभावीपणे काम करत आहे. प्रहार संघटनेच्या माध्यमातून सांगलीसह राज्यातील शिक्षकांच्या अनेक न्याय मागण्या  सुटल्या आहेत. त्यामुळे शिक्षकांचा मोठा पाठिंबा या संघटनेस मिळत असल्याने संघटनेला मोठी बळकटी मिळत आहे.आगामी काळात सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक विकास सहकारी बँकेच्या निवडणुकीत प्रहार संघटना निर्णायक भूमिका घेणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर क्षीरसागर यांनी दिली.
 
पतसंस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्हा प्रहार शिक्षक संघटनेच्या कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर क्षीरसागर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, सांगली जिल्ह्यात आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली प्रहार संघटना अल्पावधित शिक्षकांच्यात विश्वासाचे स्थान निर्माण केले आहे. संघटनेस अनेक वर्षाचा चळवळीचा अनुभव व इतिहास आहे. संघटनेच्या माध्यमातून शिक्षकांच्या अनेक मागण्या मार्गी लागल्या आहेत. आमदार बच्चू कडू मंत्रालय पातळीवर अनेक महत्त्वाचे प्रलंबित प्रश्न सोडवले आहे. यामुळे संघटनेची ताकद वाढली आहे. 

सांगली जिल्ह्यात पतसंस्थेचे बहुतांश सभासद  प्रहार संघटनेच्या संपर्कात असून  काही दिवसात होणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकीत आमची संघटना  निर्णायक भूमिकेत राहून  अस्तित्व दाखवून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. निवडणुकीत  सत्तापरिवर्तन करण्यासाठी  संघटनेतील अनेक शिक्षक आग्रही आहेत. त्यांच्या पाठीशी राहून वेगळा इतिहास निर्माण करण्याच्या भूमिकेत संघटना राहील. तरीही योग्य विचार करुन निर्णय घेण्याचे बैठकीत ठरले आहे. प्रत्यक्ष,फोन व इतर माध्यमातून संपर्कात असणाऱ्या सभासदांच्या न्याय मागण्यासंदर्भात त्यांना त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी  प्रयत्न करू अशी ग्वाही चंद्रशेखर क्षीरसागर  यांनी दिली. बैठकीस सरचिटणीस  अमोल जाधव, सचिन बामणे, भानुदास पवार, राजू जाधव, राजेश जोशी, सचिन पवार, शहाजी शिंदे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.