शिक्षण विभागातील वरिष्ठ सहाय्यक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !
नासिक:- पंचायत समिती येवला येथील शिक्षण विभागातील वरिष्ठ सहाय्यक आलोसे संजय रामदास पाटील यांस लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने ताब्यात घेण्यात आले. तक्रारदार हे उपशिक्षक असून त्यांची आणि त्यांची पत्नी यांचे अंतिम वेतन देयक तयार करून देण्यासाठी आलोसे संजय रामदास पाटील वरिष्ठ सहाय्यक शिक्षण विभाग पंचायत समिती येवला जिल्हा नाशिक यानी २०००/-रुपयाची मागणी करून तक्रारदार यांचे कडून येवला पोस्ट ऑफिस समोर पंच साक्षीदार समक्ष स्विकारताना त्यांस रंगेहात पकडण्यात आले असुन याबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
सापळा अधिकारी साधना भोये, पोलीस निरीक्षक, सापळा पथक पो. ह. चंद्रशेखर मोरे, पो. ना. दीपक पवार यांनी श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर पोलीस अधीक्षक, माधव रेड्डी अप्पर पोलिस अधिक्षक, नरेंद्र पवार वाचक, पोलीस उपअधीक्षक, पोलीस अधीक्षक कार्यालय , ला.प्र.वि. नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कारवाई करण्यात आली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.