Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

आता एकाच रक्त चाचणीत होणार ५० प्रकारच्या कर्करोगाचे निदान

आता एकाच रक्त चाचणीत होणार ५० प्रकारच्या कर्करोगाचे निदान


कॅन्सर म्हणजेच कर्करोग हा अतिशय गंभीर स्वरुपाचा आजार समजला जातो. हा पूर्णपणे बरा होऊ शकत नाही. यातील कर्करोगाच्या काही प्रकारावर अजूनही उपाय शोधले जात आहेत. आता याच कर्करोगाच्या निदानाची पद्धत मात्र विकसित करण्यात ब्रिटनच्या शास्त्रज्ञांना यश आले आहे. आता एकाच रक्त चाचणीतून तब्बल ५० प्रकारच्या कर्करोगाचे निदान होणार आहे.

त्यामुळे या आजाराच्या निदानासाठीपुन्हा पुन्हा चाचण्या करण्याची गरज भासणार नाही. विशेष म्हणजे ही रक्तचाचणी तज्ज्ञ डॉक्टरऐवजी सामान्य डॉक्टर करू शकेल. या रक्त चाचणीला 'गॅलरीब्लड टेस्ट' असे नाव दिले आहे. या चाचणीच्या माध्यमातून रक्तातील डीएनएचे परीक्षण केले जाते. यामुळे कर्करोगाचे निदान लवकर होण्यास मदत होते. त्यामुळे रुग्णांवर लवकरात लवकर उपचार करण्यास मदत होणारआहे, असे प्रा. डॉ. ब्रायन निकोलस यांनी सांगितले. ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या मदतीने या चाचणीचे परीक्षण नुकतेच करण्यात आले. 

५०० रुग्णांच्या सहभागातून हे परीक्षण करण्यात आले. विशेष या चाचणीतून कर्करोगाची सुरुवात नेमकी कोणत्या अवयवापासून झाली हे कळणार आहे. ९८ टक्के प्रकरणात यासंदर्भातील अचूक निदान करण्यात आले आहे. मात्र ही चाचणी पूर्णपणे दोषमुक्त झालेली नाही. त्यावर आणखी संशोधन आणि सुधारणा करण्याची गरज असल्याचे शास्त्रज्ञांचे मत आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.