Breaking News

    Loading......

Sangli Darpan

Krushnakath News

रिलायन्स ज्वेल्स दरोडा प्रकरण, मुंबईतुन खरेदी केली सफारी!

रिलायन्स ज्वेल्स दरोडा प्रकरण, मुंबईतुन खरेदी केली सफारी!


सांगली : बिहारच्या वजीराने आंध्रची प्यादी दिशाभूल करण्यासाठी वापरली. महाराष्ट्रातील मोहऱ्याचा त्यांनी चांगलाच उपयोग करून घेतला. या मोहऱ्यालाच मुंबईतुन सफारी खरेदी करायला लावली. शिवाय चोरीच्या दोन दुचाकीची व्यवस्था त्यांनी केलीच होती. बिहारच्या या वजीराने राजाचा 'प्रताप' व्यवस्थित अंमलात आणला. रिलायन्स ज्वेल्समधील या दरोड्यानंतर सांगली पोलिसांनी तांत्रिक तसेच अन्य पुरावे नसताना चांगलीच प्रगती केली आहे.

महाराष्ट्रातील मोहरा असलेल्या गुळाच्या गणपतीचा फायदा घेत बिहारच्या वजीराने 'राणा'साठी हा दरोडा घातला. बिहारच्या जेलमधून हैद्राबादला गेलेल्या एका हस्तकाने यात मोठी भूमिका बजावली. प्रत्येक ठिकाणी मोहऱ्याला पुढे करत त्यांनी काहीच पुरावे ठेवले नाहीत. मुंबईतुन खरेदी केलेली ती सफारी भोसे येथे सोडून दिली. त्या गाडीत त्यांनी वापरलेली अंतवस्त्रासह प्रत्येक गोष्ट सोडली होती. पण आपले पोलीस फारच हुशार निघाले.

त्यांनी वजीराचे हस्तक सांगली जवळच्याच दुसऱ्या जिल्ह्यात राहिलेल्या ठिकाणाचा शोध घेतला. शिवाय प्रसिध्द असलेल्या होलसेल बाजारातून कपडे तसेच अन्य साहित्य खरेदी केल्याची माहिती मिळवली. शिवाय ते त्या बाजाराजवळ असलेल्या शहरातील लॉजमधील माहितीही घेतली.

त्यानंतर पथके विविध राज्यात गेली. पथकांना मिळालेल्या माहितीनुसारप्यादी चौकशीसाठी आणण्यात आली. पण वजीर आणि त्याच्या 'राणा'ने(राजा) दिशाभूल केल्याचे लक्षात आले. त्यानंतर कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी आणि सांगलीचे पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी महत्वाच्या सूचना दिल्यानंतर तपासाला गती मिळाली.

आता काही बाबी स्पष्ट झाल्या आहेत. त्यामुळे प्यादी, मोहरा यांचे सहभाग निश्चित झाले आहेत. वजीर आणि त्यांच्या हस्तकांची नावेही निष्पन्न होतील. पण तो राणा (राजा) सांगली पोलिसांच्या हाती लागणार का हे लवकरच समजेल.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.