Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

आयुष प्रसाद 'अ‍ॅक्शन मोड ' मध्ये... म्हणुन....अधिकाऱ्याला पाठवले थेट दवाखान्यात

आयुष प्रसाद 'अ‍ॅक्शन मोड ' मध्ये... म्हणुन....अधिकाऱ्याला पाठवले थेट दवाखान्यात 



जिल्हा परिषदेत विभागप्रमुखांची आढावा बैठक होती. एक अधिकारी आले आणि तब्येत बरी नसल्याचे कारण देत लवकर जाण्याची परवानगी मागितली. 'तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका,' असा सल्ला देत मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी संबंधित अधिकार्‍याला थेट रुग्णालयातच दाखल केले. प्रत्येक विभागाचा आठवड्यातील कामाच्या प्रगतीचा आढावा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडूनघेतला जातो. मात्र, या आढावा बैठकीला अनेकदा अधिकारी उशिरा येतात किंवा दांड्या मारतात.

उशिरा येणार्‍या अधिकार्‍यांबद्दल नाराजी व्यक्त केली आणि न आलेल्यांना नोटीस देण्याच्या सूचना केल्या. दरम्यान, एका अधिकार्‍याने आजारी असल्याचे कारण देताच जिल्हा आरोग्य अधिकारी आणि अंगरक्षकाला संबंधित अधिकार्‍यांना रुग्णालयात दाखल करण्याच्या सूचना केल्या. आता मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांचीच सूचना म्हटल्यानंतर दोघांनी सूचनांची तत्काळ अंमलबजावणी केली. खासगी रुग्णालयात जाऊन तपासणी केल्यानंतर संबंधित अधिकार्‍याचा रक्तदाब वाढल्याचे आणि ताप आल्याचे निदर्शनास आले.

आयुष प्रसाद 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये…

प्रत्येक विभागनिहाय बैठकीत आढावा घेताना कामांमध्ये प्रगती नसल्याने प्रसाद यांनी अधिकार्‍यांना चांगलेच धारेवर धरले होते. कामांची प्रगती का कमी आहे? याबद्दल अधिकार्‍यांना जाब विचारला. तसेच कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना देखील या वेळी देण्यात आल्या. प्रसाद हे महिनाभराच्या प्रशिक्षणानंतर नुकतेच जिल्हा परिषदेत रुजू झाले. तसेच याच कालावधीत पालखी सोहळ्याचे नियोजन सुरू असल्याने इतर विभागांच्या कामांकडे काहीसे दुर्लक्ष झाले होते. आता पालखी सोहळ्याचे नियोजन नसल्याने पूर्ववत अधिकार्‍यांना कामे देण्यासाठी आयुष प्रसाद हे 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये आले आहेत.

आधीही दिल्या होत्या नोटिसा

बैठकांना अनुपस्थित राहणार्‍या अधिकार्‍यांना यापूर्वी देखील नोटिसा देण्यात आल्या होत्या. त्यानंतर पुन्हा एकदा बैठकांना गैरहजर राहणार्‍यांची संख्या वाढल्याने नोटिसा काढण्यात येणार आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.