कर्मवीर पतसंस्थेचे संचालक डॉ. रमेश ढबू यांना ८० व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा
डॉ. ढबू दांपत्यास वाढदिवसानिमित्त कर्मवीर पतसंस्थेतर्फे शुभेच्छा
सांगली : कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित.. सांगली चे संस्थापक संचालक डॉ. रमेश वसंतराव ढबू यांचा ७९ वा वाढदिवस संस्थेत साजरा करुन त्यांना दिर्घायुष्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी त्यांच्या पत्नी डॉ. सुनंदा रमेश ढबू यांना देखील त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. संस्थेचे चेअरमन श्री. रावसाहेब जिनगोंडा पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. रमेश ढबू यांनी संस्थेसाठी दिलेल्या महत्वपुर्ण योगदानाचा आवर्जुन त्यांनी उल्लेख केला.
गेली ३६ वर्षे संस्थेचे संचालक मंडळ कार्यरत आहे. सर्वाच्या सहकार्याने संस्थेने उत्तम प्रगती केली आहे. त्यामध्ये संचालकांचे बहुमोल योगदान आहे. डॉ. रमेश ढबू म्हणजे एक अभ्यासू शिस्तप्रिय निर्णय क्षमता व नेतृत्व क्षमता असणारे आणि साधी राहणी आणि उच्च विचारसरणी या तत्वाने चालणारे व्यक्तीमत्व संचालक म्हणुन संस्थेस लाभले. व्यक्तीची पारख करण्याचा त्यांचा हातखंडा वाखाणण्यासारखा आहे. तसेच स्पष्ट वक्तेपणा हा गुण देखील त्यांच्या अंगी जाणवल्याचे श्री. रावसाहेब पाटील यांनी आपल्या मनोगतात सांगितले. यावेळी डॉ. रमेश ढबू व डॉ. सुनंदा ढबू यांच्या हस्ते केक कापण्यात आला. उभयतांना पुष्पगुच्छ देवून त्यांना पुढील सुखी संपन्न आयुष्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी संचालक अॅड एस. पी. मगदूम, श्री. ओ. के. चौगुले (नाना ), श्री. वसंतराव धुळाप्पाण्णा नवले यांनी मनोगत व्यक्त करुन या प्रदिर्घ प्रवासातील निखळ मैत्रीच्या अनेक आठवणी सांगून डॉ. रमेश ढबू यांच्या मोठेपणाच्या आठवणींना उजाळा दिला. संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अनिल श्रीपाल मगदूम यांनी देखील संस्थेचे कामकाज करीत असताना डॉ. रमेश ढबू यांच्या कुशल आणि सखोल अनुभवाचा फायदा झाल्याचा व त्यांच्या कडून खुप शिकण्यासारखी गोष्टी आहेत व त्याचा जीवनामध्ये लाभ झाल्याचे सांगितले.यावेळी सत्कारास उत्तर देण्याना ढबू यांना मनातून भरुन आल्याचे जाणवले. त्यांनी कठीण परिस्थितीत शिक्षण पुर्ण केले. त्यावेळी त्यांनी जिल्हयात १० वी बोर्डात चांगले गुण प्राप्त केले. तसेच ऑर्थोपेडीक डिग्री सुद्धा शिष्यवृत्ती सह दिल्ली येथून प्राप्त केली. या प्रवासात त्यांच्या आजी कडून त्यांना संस्कार व जिद्दीचे धडे मिळाले. तसेच पत्नीची बहुमोल साथ लाभल्याचे त्यांनी सांगितले. जीवनात मी अतिशय समाधानी असल्याचे सांगुन जीवनात ज्याचे प्रेम लाभले त्यांचे ऋण व्यकत केले.
यावेळी संस्थेचे संचालक डॉ. एस.बी. पाटील ( मोटके ). डॉ. चेतन आप्पासाहेब पाटील संचालिका श्रीमती भारती आप्पासो चोपडे, तज्ञ संचालक डॉ. नरेंद्र आनंदा खाडे, श्री. लालासो भाऊसो थोटे यांचे सह डॉ. ढबू यांचे नातेवाईक व सहकारी उपस्थित होते. आभार व्हाईस चेअरमन डॉ. अशोक आण्णा सकळे यांनी मानले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.