Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक; पतीच्या नजरेसमोर पत्नीचा मृत्यू!

भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक; पतीच्या नजरेसमोर पत्नीचा मृत्यू!


सोलापूर जिल्ह्यातून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. दुचाकीवरून जात असलेल्या पती-पत्नीला भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. या धडकेत पत्नीचा जागीच मृत्यू, तर पती गंभीर जखमी झाला आहे. ही दुर्देवी घटना सोलापूर  महामार्गावरील धुळखेडजवळ गुरूवारी सायंकाळच्या सुमारास घडली.

आषाढी एका दिवशीच पतीच्या नजरेसमोर पत्नीने प्राण सोडल्याने परिसरातून मोठी हळहळ व्यक्त होत आहे. जनाबाई कांतीलाल गुमतापूरे (वय ४८ वर्ष) असे अपघातात ठार झालेल्या पत्नीचे नाव आहे. या अपघातात कांतीलाल गुमतापूरे (वय ५५ वर्ष) जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, आषाढी एकादशीच्या निमित्ताने कांतीलाल गुमतापूरे हे पत्नी जनाबाई गुमतापूरे यांच्यासोबत दुचाकीवरून कर्नाटकातील येळगी येथे गेले होते. तेथून सोलापूरच्या दिशेने येत असताना टाकळी ते धुळखेड दरम्यान भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक  दिली. ही धडकी इतकी भीषण होती, की यामध्ये जनाबाई यांचा जागीच मृत्यू झाला. तर कांतीलाल हे बाजूला फेकल्या गेल्याने गंभीर जखमी झाले. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांसह पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

पोलिसांनी  जनाबाई यांचा मृतदेह ताब्यात घेतला असून कांतीलाल यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कांतीलाल गुमतापूरे हे दक्षिण सोलापुर तालुक्यातील मनगोळी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक आहेत. अपघातात त्यांच्या पत्नीचं निधन झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.