मधुचंद्र नंतर पत्नीने कापले सीआरपीएफ जवानाचे गुप्तागं; लॉजमध्ये गेले अन्.....
पाटण्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका माथेफिरु प्रेयसीने नाराज होऊन पतीचे गुप्तांग कापून टाकल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. प्रेयसीने आधी पत्नी बनून प्रियकरासोबत हनिमून साजरा केला आणि नंतर चाकूने त्याचे गुप्तांग कापून टाकलं. पतीला गंभीर अवस्थेत पीएमसीएच रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. बुधवारी गांधी मैदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एक्झिबिशन रोडवर असलेल्या हॉटेलमध्ये हा सर्व प्रकार घडला आहे. या प्रकारानंतर पोलिसांनी प्रेयसीला अटक केली असून पुढील तपास सुरु केला आहे.
पीडित पती हा केंद्रीय राखीव पोलीस दलात जवान सीआरपीएफ जवानआहे. सध्या तो छत्तीसगडच्या सुकमा येथे तैनात होता. या हल्ल्यात पतीचा खासगी भाग हा 60 टक्के कापला गेल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. पोलिसांनी आरोपी तरुणीला ताब्यात घेतले आहे. ही मुलगी मूळची दरभंग्याची असून, ती गेल्या चार वर्षांपासून पाटण्यात शिकत होती. महत्त्वाची बाब म्हणजे दोघेही नातेवाईक होते. दोघांनीही दोनच दिवसांपूर्वी लग्न केले होते. त्यानंतर एका हॉटेलमध्ये तरुणीने पीडित जवानाच्या गुप्तांगावर हल्ला केला. पीडित जवान हॉटेलमधल्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने रुग्णालयात पोहोचला सीआरपीएफ जवानाचा विवाह 23 जून रोजी शिवहर येथील एका मुलीसोबत होणार होता. यामुळे त्याची प्रेयसी चिडली होती.जवानाने पोलिसांना सांगितले की, "माझे तीन वर्षांपासून तरुणीवर प्रेम होते. पण माझे लग्न निश्चित झाले होते आणि 23 जून रोजी विवाह होणार होता. लग्नाची तयारीही सुरू होती. हा प्रकार प्रेयसीला कळताच तिने जीव देण्याची धमकी देत मला पाटण्याला बोलावून घेतले. प्रेयसीने फोन करून पाटण्याला ये, नाहीतर आत्महत्या करेन, असेही तिने सांगितले. यानंतर 3 जून रोजी मी सुकमाहून पाटण्याला आलो आणि एक्झिबिशन रोडवरील एका हॉटेलमध्ये थांबले. यादरम्यान प्रेयसीने लग्नासाठी माझ्यावर दबाव आणला तेव्हा आम्ही 5 जून रोजी पाटणा शहर न्यायालयात लग्न केले. त्यानंतर हॉटेलवर परतलो," असे जवानाने सांगितले.
त्यानंतर जवान हॉटेलमध्ये अर्धनग्न अवस्थेत बेडवर पडला होता. त्याचवेळी प्रेयसीने मुलावर लग्न मोडण्यासाठी दबाव टाकला. यानंतर जीवे मारण्याची धमकी दिली. जवानाने तिला खूप समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. लग्न मोडलं तर आमचा खूप अपमान होईल, असेही त्याने सांगितले. पण प्रेयसी ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हती. प्रेयसी त्याला मारून टाकेल किंवा जीव देईल असे सांगत होते. यानंतर तिने बॅगेतून चाकू काढला आणि जवानाच्या गुप्तांगावर हल्ला केला. त्यानंतर जवान कसातरी ओरडत रुमच्या बाहेर आला आणि हॉटेलच्या काउंटरवर बसलेल्या लोकांना याची माहिती दिली. यानंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी पोलिसांनाही याची माहिती दिली.
दरम्यान, गांधी मैदानाचे पोलीस ठाण्याचे प्रभारी सुनील कुमार राजवंशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्ल्यात जखमी झालेल्या जवानाला मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला होता आणि तो मदतीसाठी ओरडत खोलीबाहेर पळाला. हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी त्याला जखमी अवस्थेत पीएमसीएचमध्ये नेले. मात्र, आता जवानाची प्रकृती धोक्याबाहेर आहे. तर महिलेविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 326 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.