यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचा बहिस्थ परिक्षक लाचलुचपतच्या जाळ्यात!
नासिक: अमळनेर जि. जळगांव येथील आलोसे विजय गुलाबराव पाटील, बहिस्थ परीक्षक, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, यांस लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने ताब्यात घेण्यात आले. यातील तक्रारदार यांची पत्नी प्रियंका ह्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ अंतर्गत बिलीप ची अंतिम परीक्षा देत आहेत. सदर परीक्षेचे पेपर्स हे अमळनेर प्रताप महाविद्यालय येथे सुरू आहेत. तक्रारदार यांची पत्नी प्रियंका व त्यांच्या सोबतच्या एकूण ८ विद्यार्थ्यांना आलोसे हे पेपर्स घेऊन विनाकारण त्रास देतात व त्यांना त्रास न देता सहकार्य करण्यासाठी आलोसे हे तक्रारदार यांचेकडे प्रत्येक विषयासाठी १००/- रू असे एकूण ९ विषयाचे मिळून प्रत्येक विद्यार्थ्याकडे ९००/- रू असे एकूण ७२००/- रुपयाची लाचेची मागणी करत होते. याबाबत तक्रारदार यांनी अमळनेर येथे दिलेल्या तक्रारीवरून आलोसे यांनी तक्रारदार यांचेकडे पंचासमक्ष तडजोडी अंती ५६००/- रु ची लाचेची मागणी करून त्यापैकी तक्रारदार यांनी दिलेली ५०००/- रुपये रक्कम लाच म्हणून पंचांसमक्ष स्वीकारताना आलोसे यांना रंगेहात पकडण्यात आले. म्हणून त्यांचे विरुद्ध अमळनेर पो स्टे येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
सापळा अधिकारी अनिल बडगुजर पोलीस उप आधीक्षक, सापळा पथक राजेन्द्र गिते, संदीप बत्तिसे, संजय ठाकरे, संतोष गांगुर्डे यांनी सौ.शर्मिष्ठा घारगे-वालावलकर साो, पोलीस अधीक्षक, नरेंद्र पवार वाचक पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कारवाई करण्यात आली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.