Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कर्मवीर पतसंस्थेचे कार्य सहकाराला मार्गदर्शक : जगन्नाथ (आप्पा) शिंदे

कर्मवीर पतसंस्थेचे कार्य सहकाराला मार्गदर्शक :  जगन्नाथ (आप्पा) शिंदे 


सांगली :- महाराष्ट्र राज्य केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट असोशिएशनचे अध्यक्ष माजी आमदार जगन्नाथरावजी (आप्पा) शिंदे यांनी नुकतेच कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्थेच्या नुतन कार्यालयास सदिच्छा भेट दिली. त्यावेळी त्यांनी ही भावना व्यक्त केली. मा. जगन्नाथरावजी शिंदे यांचा संस्थेच्या वतीने चेअरमन श्री रावसाहेब पाटील यांनी शॉल व पुष्पगुच्छ देवून सत्कार केला.

स्वागत व प्रास्ताविक संस्थेचे चेअरमन श्री. रावसाहेब जिनगोंडा पाटील यांनी केले त्यांनी संस्थेची सांपत्तिक स्थिती विषद केली तसेच संस्थेची माहिती पाहुण्यांना दिली संस्थेच्या ठेवी रुपये ९०१ कोटी आहेत. संस्थेने ६२.५ कोटीचे कर्ज वाटप केले आहे. संस्थेचा स्वनिधी ८५ कोटी आहे. संस्थेची गुंतवणुक ३८३ कोटीची आहे. संस्थेचा कारभार ६० शाखा मधुन सुरु असून संस्थेची सभासद संख्या ५७००० आहे. संस्थेचा एकूण व्यवसाय २००० कोटीकडे वाटचाल करीत आहे. संस्था सभासदांना तत्पर सेवा देते त्यामुळे संस्थेचे सभासद संतुष्ठ असल्याचे श्री. रावसाहेब पाटील यांनी सांगितले. मा जगन्नाथरावजी शिंदे हे समस्त केमिस्ट संस्थेच्या कार्याची प्रेरणा आहेत असे रावसाहेब पाटील यांनी सांगितले.


यावेळी बोलताना जगन्नाथरावजी शिंदे म्हणाले, कर्मबीर संस्थेची प्रगती पाहून खरोखर भारावून गेलो आहे ३८ वर्षात संस्थेने एखाद्या बँकेच्या बरोबरीने प्रगती केली आहे. याचे कारण म्हणजे संचालक मंडळाने एकविचाराने घेतलेले चौकस निर्णय आणि प्रामाणिक प्रयत्न हेच याचे गुपित असल्याचे त्यांनी सांगितले कोणत्याही क्षेत्रात यश प्राप्त करण्यासाठी कांही वेळा आडचणीचा सामना करावा लागतो त्या आडचणीवर मात करून कर्मवीर पतसंस्थेने आपली प्रगती साध्य केली आहे संस्थेचा १०० शाखा पर्यंत विस्तार व्हावा अशा शुभेच्छा त्यांनी आपल्या मनोगतात दिल्या. संस्थेच्या ताळेबंद अभ्यास केला असता संस्थेची आर्थिक स्थिती भक्कम असल्याची विशेष टिप्पणी त्यांनी केली आपण कर्मवीर आण्णांच्या नावाने आपण अतिशय उत्तम संस्था चालवित आहात. सहकारामध्ये व्यवसाय निर्मितीची मोठी क्षमता आहे असे त्यानी सांगितले.

या कार्यक्रमास महाराष्ट्र फार्मसी कौन्सील चे सदस्य श्री विजय पाटील ऑर्गनायजिंग सेक्रेटरी श्री. मदन पाटील वेस्टर्न झोन अध्यक्ष सोमेश्वर खरारे सांगली जिल्हा केमिस्ट असोशिएशनचे अध्यक्ष श्री भरत सावंत, वेस्टर्न झोनचे माजी उपाध्यक्ष श्री संजय शेटे यांचे सह श्री. शिवाजीराव ठमगे श्री कुमार बोरगांवे श्री दिपक मगदुम श्री सचिन सकळे श्री सुशिल हाडदरे हे केमिस्ट असोशिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी संस्थेचे व्हाईस चेअरमन डॉ. अशोक आण्णा सकळे. अँड. एस. पी. मगदूम डॉ. रमेश वसंतराव ढवू. श्री. अ. के चौगुले (नाना ). डॉ. एस. बी. पाटील ( मोटके) संचालिका श्रीमती भारती आप्पासाहेब चोपडे तज्ञ संचालक डॉ. नरेंद्र आनंदा खाडे, श्री लालासाहेब भाऊसाहेब थोटे उपस्थित होते. आभार मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अनिल श्रीपाल मगदूम यांनी मानले.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.