Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

दोन हजारांची नोट नाकारणाऱ्या 'त्या' डॉक्टरची चौकशी

दोन हजारांची नोट नाकारणाऱ्या 'त्या' डॉक्टरची चौकशी


कोल्हापूर : औषधे घेण्यासाठी दिलेली 2 हजारांची नोट न स्वीकारणाऱ्या डॉक्टरची चौकशी करण्यात आली. महापालिका अधिकारी आणि अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष दवाखान्यातून जाऊन याबाबत विचारणा केली.

तसेच, हॉस्पिटलची तपासणी केली. याचा अहवाल बनवून तो संबंधित यंत्रणांना पाठवला जाणार आहे. त्यानंतर कारवाईचे स्वरुप स्पष्ट होईल. संबंधित रुग्णाच्या कुटुंबीयांनी याबाबतची तक्रार मुख्यमंत्री कार्यालयाकडे केली. त्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयाने महापालिकेकडे याबाबतची चौकशी करून अहवाल पाठवण्याची सूचना केली.

काल महापालिका आणि अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी दवाखान्यात जाऊन झालेल्या प्रकाराची चौकशी केली. तेथील डॉक्टरांचीही चौकशी केली गेली. याचा अहवाल बनवून पुढील कारवाईची दिशा ठरवली जाईल, असे मनपा अधिकाऱ्यांनी सांगितले.

दवाखान्यात बॉम्बे नर्सिंग ॲक्टचे उल्लंघन झाले आहे का याची आम्ही चौकशी केली. तसेच अन्न व औषध प्रशासानाच्या अधिकाऱ्यांनी नियम आणि कायद्यांप्रमाणे रुग्णालयाचे कामकाज चालते का ते पाहिले. याबाबतचा विस्तृत अहवाल बनवला जाणार आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.