बेडवर ५०० रुपयांच्या नोटांचे बंडल ठेऊन पोलीस अधिकाऱ्याचा पत्नी अन् मुलासह सेल्फी
नवी दिल्ली : प्रसिद्धीसाठी आजकाल लोक काय करतील याचा खरंच नेम नाही. सध्या असाच एक खळबळजनक फोटो व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका बेडवर ५०० च्या नोटांचे बंडल्स असून त्याच्याजवळ दोन मुले बसलेली दिसत आहे. हा फोटो पोलिस अधिकाऱ्याच्या मुलांचा असल्याची माहिती समोर आले आहे.
उत्तर प्रदेशमधील उन्नाव येथील पोलिस अधिकाऱ्याच्या कुटुंबाला नोटांच्या बंडलसह सेल्फी काढणे चांगलेच महागात पडले आहे. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या फोटोमध्ये पोलिस अधिकाऱ्याची पत्नी आणि दोन मुले जवळपास १४ लाख रुपयांच्या रोख रकमेसह बेडवर बसलेले दिसत आहेत. बेडवर ५०० च्या नोटांचे बंडल ठेवलेले दिसत आहे. जसा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला त्यानंतर ताबडतोब वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
स्टेशन इन चार्ज रमेशचंद्र सहानी यांची पोलीस लाईन्स येथे बदली करण्यात आली आहे. तसेच, सहानी यांनी स्वतःचा बचाव केला आहे आणि सांगितले आहे की हे फोटो १४ नोव्हेंबर २०२१ रोजी घेतले होते, जेव्हा त्यांनी कौटुंबिक मालमत्ता विकली होती. या घटनेची माहिती देताना एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने एका इंग्रजी वर्तमानपत्राला, "स्टेशन-हाऊस ऑफिसरचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात पोलिसाची पत्नी आणि त्याची मुले नोटांचे बंडल असलेले दिसत आहेत. आम्ही या प्रकरणाची दखल घेतली आहे. आणि पोलिसाची पोलिस लाईनमध्ये बदली करण्यात आली आहे. तपास सुरू करण्यात आला आहे." अशी माहिती दिली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.