Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

आज गझल मंथन साहित्य संस्थेमार्फत प्रथमच गझल सादरीकरण कार्यशाळेचे पुण्यात आयोजन करण्यात आले होते.

आज गझल मंथन साहित्य संस्थेमार्फत प्रथमच गझल सादरीकरण कार्यशाळेचे पुण्यात आयोजन करण्यात आले होते.


आज गझल मंथन साहित्य संस्थेमार्फत प्रथमच गझल सादरीकरण कार्यशाळेचे पुण्यात आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून गझलकारांनी मोठ्या मोठ्या संख्येने या कार्यशाळेला हजेरी लावली. डॉ.कैलास गायकवाड आणि शाम खामकर या दोन ज्येष्ठ गझलकारांनी मार्गदर्शकांची भूमिका यशस्वीरीत्या पार पाडली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना संस्थेचे अध्यक्ष श्री. अनिल कांबळे यांनी सांगितले की गझल मंथन साहित्य संस्थेकडून मराठी गझलेच्या प्रसार आणि प्रचाराचे काम अव्याहतपणे सुरू आहे. यातून केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली वेगळी ओळख निर्माण करणारे गझलकार घडविण्यासाठी संस्था निशुल्क गझल लेखन आणि सादरीकरण प्रशिक्षण वर्ग चालवित आहे.  त्यानंतर तहत, तरन्नुम आणि तर्ज या गझल सादरीकरण प्रकारांचे प्रत्यक्ष सादरीकरण म. भा. चव्हाण, ए. के. शेख आणि सुनिती लिमये यांनी सादर केले.


दुपारच्या सत्रात ज्येष्ठ गझलकार ए. के. शेख यांच्या अध्यक्षतेखाली काही निवडक उपस्थित गझलकारांची सादरीकरण प्रात्यक्षिके आणि त्याविषयी विवेचन झाले.  शेवटच्या सत्रातील मुशायऱ्यामध्ये सर्वश्री प्रशांत वैद्य, ए. के. शेख, आप्पा ठाकूर आणि डॉ. इक्बाल मिन्हे यांनी सादरीकरणाच्या दृष्टीने मार्गदर्शक ठरतील अशा सकस आणि बहारदार गझला सादर केल्या.प्रणाली म्हात्रे 

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.