Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगलीत गोळीबारप्रकरणी नगरसेवक मयुरेश पाटील यांच्यावर गुन्हा

सांगलीत गोळीबारप्रकरणी नगरसेवक मयुरेश पाटील यांच्यावर गुन्हा

सांगली :  शहरातील सिव्हील हॅस्पिटलजवळ गोळीबार केल्याप्रकरणी सांगलीचे नगरसेवक मयुरेश बाबासाहेब पाटील (वय ४२, रा. संजोग कॅलनी, सांगली) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर नगरसेवक पाटील यांच्या कारची तोडफोड करून त्यांच्या लॅजमधील कामगाराला मारहाण केल्याप्रकरणी तब्बल १२ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगरसेवक पाटील यांचे पिस्तूल जप्त करण्यात आले असून त्या बारा जणांपैकी तिघांना ताब्यात घेतल्याची माहिती सांगली शहरचे पोलिस निरीक्षक अभिजित देशमुख यांनी दिली. 


नगरसेवक पाटील यांनी केलेल्या गोळीबारप्रकरणी पोलिस हवालदार वसीम अत्तार यांनी फियार्द दिली आहे. त्यानुसार नगरसेवक पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाटील यांनी दिलेल्या फियार्दीनुसार समीर रसूल कटकेवाडी, अनिकेत आकाशदीप साबळे, बंडू केंगार, रियाज अपरासे तसेच अनोळखी आठजण यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी रात्री बाराच्या सुमारास ही घटना घडली. सिव्हील हॅस्पिटलसमोर नगरसेवक पाटील यांच्या मालकीचे एमपी लॅज आहे. यातील समीर कटकेवाडी आणि अनिकेत साबळे यांच्यात झालेला वाद नगरसेवक पाटील यांनी मिटवला होता. शनिवारी रात्री जेवण झाल्यानंतर ते लॅजबाहेर फिरत होते. 

पाटील यांनी त्या दोघांमधील वाद मिटवल्याच्या रागातून सवर् संशयित त्यांच्या लॅजजवळ आले. त्यांनी लोखंडी रॅड, चाकूसारखी हत्यारांनी पाटील यांना धमकावण्याचा प्रयत्न केला. तसेच लॅजमधील कामगार विशाल कलकुटगी याला मारहाण केली. त्यानंतर संशयितांनी पाटील यांच्या कारवर (एमएच १२ क्यूएम २७९९) दगडफेक करून कारचे नुकसान केले, असे पाटील यांनी दिलेल्या फियार्दीत म्हटले आहे. 

तर जीवित तसेच मालमत्तेच्या संरक्षणासाठी नगरसेवक पाटील यांनी त्यांच्या परवानाधारी पिस्तूलातून हवेत दोन गोळ्या झाडल्या. त्यांना दिलेल्या शस्त्र परवान्याचे नियम, अटी, शतीर्चे उल्लंघन करून आवश्यकता नसताना स्वतःच्या तसेच तेथे उपस्थित असलेल्यांच्या जीवितास धोका निमार्ण केला असल्याचे हवालदार अत्तार यांनी दिलेल्या फियार्दीत म्हटले आहे. याबाबत शहर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नगरसेवक पाटील यांनी गोळीबार केलेले पिस्तूल जप्त करण्यात आल्याचे पोलिस निरीक्षक अभिजित देशमुख यांनी सांगितले.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.