राऊतांच्या थुंकण्याच्या कृतीवर शरद पवार नाराज?
राज्यातील राजकारणात घडामोडींना वेग आला आहे. अशातच संजय राऊत यांनी एका पत्रकार परिषदमध्ये श्रीकांत शिंदेंचे नाव ऐकताच थुंकलं. त्यामुळे राज्यात नव्या वादाला तोंड फुटलं आहे. त्यांच्या या कृतीवर संमीश्र प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी आपली भूमिका मांडली आहे. त्याच्या विधानांमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळाला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या सभेनंतर माध्यमांशी बोलत होते. संजय राऊत थुंकल्याबाबत प्रश्न विचारला असता शरद पवारांनी स्पष्टपणे बोलण्यास नकार दिला. ते म्हणाले, "हे काही राष्ट्राचे, राज्याचे प्रश्न नाहीत. मी त्यावर भाष्यदेखील करू इच्छित नाही आणि त्याला महत्त्वही देऊ इच्छित नाही.
नेमकं काय आहे प्रकरण?
संजय राऊत यांना पत्रकार परिषदेत खासदार श्रीकांत शिंदे यांच्याबाबत प्रश्न विचारल्यार ते थुंकल्याने वाद निर्माण झाला आहे. यावर अजित पवार यांनी प्रत्येकानं तारतम्य ठेवून वागावं असा सल्ला राऊतांना दिला होता. अजित पवारांच्या सल्ल्यानंतर संजय राऊतांनी अजित पवारांवर टीका करत धरणामध्ये **** पेक्षा थुंकणं कधी चांगलं, असं म्हटलं होतं. त्यांच्या या कृत्यावरून राज्याचं राजकारण तापलेलं दिसत आहे. या वादानंतर संजय राऊतांनी जीभेचा त्रास असल्याचं सांगत त्यावर स्पष्टीकरणही दिलं.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.