Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

जिल्हा परिषद शाळेत 7 वर्षीय मुलीवर 12 वर्षाच्या मुलाकडून लैंगिक अत्याचार

जिल्हा परिषद शाळेत 7 वर्षीय मुलीवर 12 वर्षाच्या मुलाकडून लैंगिक अत्याचार


जिल्हा परिषद शाळेत एका 7 वर्षीय मुलीवर 12 वर्षीय मुलाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना 26 जून रोजी दुपारी शाळेच्या स्वच्छतागृहात घडली. लोणावळ्याजवळील ग्रामीण भागातील एका जिल्हा परिषद शाळेत ही घटना घडली आहे. या प्रकरणी 28 जून रोजी लोणावळा ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधीत अल्पवयीन मुलाला बाल कल्याण समिती समोर आणण्यात आले होते. शिवाय, मुलीला तत्काळ वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आले आहे.याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आणि अल्पवयीन मुलगा हे एकाच शाळेत शिकतात . मुलाने मुलीचा हात जबरदस्तीने पकडून तिला मुलांच्या शौचालयात नेले आणि तेथे त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. घटने दरम्यान पीडित मुलगी घाबरली आणि तिने आरडाओरडा केला. घरी परतल्यानंतर तिने तिच्या पालकांना सांगितल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेनंतर पोलीस ठाण्यात कलम पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणावळा ग्रामीण पोलीस करत आहेत.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.