सांगलीत रिलायन्स ज्वेल्सवर भरदिवसा धाडसी दरोडा गोळीबार करत 6 जणांनी लुटले पूर्ण दुकान : 8 कोटींचे दागिने लंपास
सांगली : शहरातील मार्केट यार्डजवळ असलेल्या रिलायन्स ज्वेल्सवर रविवारी दुपारी धाडसी दरोडा टाकण्यात आला. यावेळी दरोडेखोरांनी गोळीबार करत, दुकानातील कर्मचाऱ्यांना पिस्तूलाचा ध दाखवत, त्यांचे हातपाय बांधून संपूर्ण दुकानातील सोन्या-चांदीचे दागिने लुटण्यात आले. दरोडा टाकल्यानंतर चोरटे चारचाकी गाडीतून पळून गेल्याचे सांगण्यात आले.
शहरातील मार्केट यार्डजवळ रिलायन्स ज्वेल्स हे सराफी दुकान आहे. मार्केट दुपारी साडेतीनच्या सुमारास चोरटे चारचाकी गाडीतून दुकानजवळ आले. त्यानंतर दुकानात शिरून तेथील 20 ते 25 कर्मचाऱ्यांना पिस्तुल तसेच अन्य शस्त्रांचा धाक दाखवला. यातील काही कर्मचाऱ्यांचे हातपाय देखील बांधण्यात आले.त्यानंतर काही मिनिटातच चोरट्यांनी संपूर्ण दुकानातील दागिने चोरले. यावेळी चोरट्यांनी गोळीबार केल्याचेही प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. सांगली शहरातील मध्यवर्ती भागात भरदिवसा सराफी दुकानावर दरोडा पडल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर बघ्यानी मोठी गर्दी केली होती.
घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, सांगली शहरचे उपअधीक्षक आण्णासाहेब पाटील, विश्रामबागचे निरीक्षक संजय मोरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. शिवाय एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांना याची माहिती मिळताच त्यांनी सहायक पोलिस निरीक्षक संदीप शिंदे, प्रशांत निशानदार यांची दोन पथके चोरट्यांच्या मागावर पाठवली आहेत. सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजच्या आधारे पोलिस चोरट्यांच्या चारचाकी गाडीचा शोध घेत आहेत.
रस्ता दुरुस्ती कामाचा चोरट्यांनी घेतला फायदा
मार्केट यार्डमध्ये जाणाऱ्या एका रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. त्यामुळे एका रस्त्यावरूनच वाहतूक सुरू आहे. त्यामुळे या परिसरात सातत्याने वाहतूक कोंडी होत आहे. याचाच फायदा चोरट्यांनी घेतल्याची चर्चा आहे. दरम्यान किती रकमेचे दागिने चोरीला गेले याची माहिती पोलिस घेत घेत आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.