Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

राज्यातील 596 पोलिस उपनिरीक्षकांच्या बदल्या

राज्यातील 596 पोलिस उपनिरीक्षकांच्या बदल्या

मुंबई: राज्यातील शासकीय अधिकारी, कमर्चारी यांच्या सावर्जनीक बदल्यांच्या शेवटच्या दिवशी गृह विभागाने घाऊक बदल्या केल्या आहेत. शुक्रवारी रात्री राज्य पोलिस दलातील तब्बल 596 पोलिस उपनिरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. अपर पोलिस महासंचालक संजीव कुमार सिंघल यांनी या बदल्यांचे आदेश काढले आहेत. 

राज्य राखीव पोलिस उपनिरीक्षक पदावरील 47 अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. तर 8 जणांच्या विनंतीवरून बदल्या करण्यात आल्या आहेत. तब्बल 437 पोलिस उपनिरीक्षकांच्या नियमित बदल्या करण्यात आल्या आहेत. तर कालावधी पूणर् न झालेल्या 104 अधिकाऱ्यांच्याही बदल्या करण्यात आल्या आहेत.  

पुणे ग्रामीणकडील उपनिरीक्षक संतराम गायकवाड यांची कोल्हापूर येथे तर तुरची पोलिस प्रशिक्षण केंद्रातील चंद्रकांत भोसले यांची सातारा येथे बदली करण्यात आली आहे. सातारा येथील किरण गायकवाड यांची नानवीज पोलिस प्रशिक्षण केंद्राकडे बदली करण्यात आली आहे. सांगलीतील विजय पानपाटील यांची विनंतीवरून लातूर येथे बदली करण्यात आली आहे. सांगलीतील अविनाश बावडेकर यांची खंडाळा पोलिस प्रशिक्षण केंद्रात तर कोल्हापूर येथील विश्वास कुरणे यांची तुरची पोलिस प्रशिक्षण केंद्रात बदली करण्यात आली आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.