तब्बल 53 तासानंतर' त्या ' खात्याची ईडी चौकशी पूर्ण, आता ईडीच्या रडारवर सागंलीतील कोण?
तब्बल 53 तासानंतर इस्लामपूर पेठ येथील राजारामबापू सहकारी बँकेतील मुख्य शाखेतील चौकशी ईडीकडून अखेर पूर्ण झाली आहे. पहाटे पाच वाजता राजारामबापू बँकेतुन ईडीचे पथक बाहेर पडले. त्यामुळे अडकून पडलेले 80 कर्मचारी घरी परतले आहेत.
सांगली शहरातील पारेख बंधूंसह पाच व्यापाऱ्यांवरील छाप्यानंतर ईडीकडून त्यांच्या राजरामबापू बँकेतील खात्यांची चौकशी सुरू होती.
सांगली : सांगली शहरात इलेक्ट्रॉनिक व्यवसायिक पारेख बंधूवर ईडीकडून छापा टाकण्यात आला होता. त्यानंतर सांगली शहरातल्या अन्य तीन व्यापाऱ्यांच्या वर देखील टाकण्यात आले होते. आर्थिक व्यवहारातील अनियमितता त्यामुळे छापे टाकण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला होता. या अनुषंगाने ईडीकडून व्यापाऱ्यांची कसून चौकशी सुरू होती. त्या चौकुशीमध्ये टाकण्यात आलेल्या व्यापाऱ्यांच्या बँक खात्यांची देखील चौकशी करण्यात आली होती.
सांगलीत ईडी चौकशी
शहरातल्या बँकेमध्ये छापे :
त्यामध्ये पारेख बंधूंसह अन्य तीन व्यापाऱ्यांचे सांगली शहरातल्या राजाराम सहकारी बँकेच्या शाखेत खाते असल्याचे समोर आले होते. त्यानंतर इडीकडून पहिल्यांदा शहरातल्या बँकेमध्ये छापे टाकण्यात आलेल्या व्यापाऱ्यांच्या बँक खात्यांची चौकशी सुरू करण्यात आली होती. यानंतर ईडीच्या पथकाकडून राजारामबापू सहकारी बँकेच्या इस्लामपूर पेटीतील मुख्य शाखेमध्ये चौकशी सुरू करण्यात आली होती.
53 तास ईडी चौकशी : या चौकशीनंतर बँकेमध्ये असणारे कर्मचारी हे अडकून होते. सुमारे 80 कर्मचारी हे बँकेतल्या मुख्य शाखेमध्ये अडकून होते. तब्बल 53 तासांच्या ईडीच्या चौकशीनंतर पहाटे पाच वाजता ईडीचे अधिकारी बँकेतुन बाहेर पडताच बँक प्रशासनाकडून सुटकेचा श्वास सोडण्यात आला. त्यानंतर सर्व कर्मचारी हे घरी परतले आहेत. मात्र ईडीकडून करण्यात आलेल्या बँक खात्याच्या चौकशीबाबत कोणत्याही प्रकारची माहिती मिळू शकली नाही.
ईडीच्या चौकशीच्या कारवाईमुळे खळबळ :
राजारामबापू सहकारी बँक ही राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी संबंधित असल्याने ईडीच्या चौकशीच्या कारवाईमुळे मोठी खळबळ उडाली होती. यामुळे उलट-सुलट चर्चा देखील जिल्ह्यामध्ये सुरू होत्या. दरम्यान बँकेचे अध्यक्ष शामराव पाटील यांनी केवळ छापे टाकण्यात आलेल्या व्यापाऱ्यांचे खाते बँकेत असल्याने त्या खात्यांची चौकशी करण्यात आली आहे. अन्य कोणताही संदर्भ अथवा कारण नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.