Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

तुमचं पॅनकार्ड सुरक्षित आहे का? 2600 बनावट कंपन्या, 15000 कोटींचा मोठा भ्रष्टाचार उघड

तुमचं पॅनकार्ड सुरक्षित आहे का? 2600 बनावट कंपन्या, 15000 कोटींचा मोठा भ्रष्टाचार उघड


नवी दिल्ली : भारतात भ्रष्टाचार करुन पळून गेलेल्या विजय माल्या आणि नीरव मोदी यांना मागे टाकणारा 15 हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचं प्रकरण समोर आलं आहे. हजारो नागरिकांच्या पॅनकार्डचा डेटा आणि खोट्या कागदपत्रांच्या आधारे १५ हजार कोटींचा भ्रष्टाचार करणारी टोळी गजाआड करण्यात आली आहे. या टोळीनं खोट्या-बनावट कंपन्या स्थापन करुन सरकारी खजिना लुटण्याचं काम केल्याचं उघड झालं आहे. या टोळीचा म्होरक्यासह 8 जणांना अटक करण्यात नोएडा पोलिसांना यश आलंय. विजय माल्या याच्यावर 9 हजार कोटी तर नीरव मोदीवर 14 हजार कोटींच्या बँकेतील गैरव्यवहारांचा आरोप आहे. त्याहीपेक्षा हा भ्रष्टाचार मोठा आहे.

अडीच हजार बनावट कंपन्यांतून भ्रष्टाचार

ही टोळी 2600 बनावट कंपन्यांच्या माध्यमातून देशभरात घोटाळा करत असल्याचं समोर आलंय. या आठ आरोपींकडून आठ लाख भारतीय नागरिकांच्या पॅनकार्डची माहिती आणि खोटी कागदपत्रं जप्त करण्यात आली आहे. एका सीएला या प्रकरणात पोलिासंनी अटक केली आहे. या आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी दिल्ली, पश्चिम बंगाल, गाझियाबाद आणि चंदीगडमध्ये छापेमारी केली होती.

50 हून अधिक जणांचा गँगमध्ये सहभाग

या टोळीत 50 हून अधिक जणांचा सहभाग असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. देशाच्या विविध भागातून हा सगळा भ्रष्टाचार करण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितंलय. या आरोपींकडून 12 लाख 66 हजार रुपयांची कॅश, 32 मोबाील, 4 लॅपटॉप, 116 बनावट आधार कार्ड, 3 कार, बनावट जीएसटी नंबर यासह इतर कागदपत्रं जप्त करण्यात आलीय.

कसे तयार करत होते खोटी कागदपत्रं?

हे आरोपी बनावट कंपनी स्थापन करण्यासाठी आणि जीएसटी नंबर मिळवण्यासाठी खासजी वेबसाईट आणि आउटसोर्सिंग कंपन्यांच्या माध्यमातून नागरिकांच्या पॅनकार्डचा डेटा मिळवत असत. त्यानंतर झोपडपट्टीत राहणाऱ्यांना पैशांषं आमिष दाखवून त्यांच्या आधार कार्डवर आरोपींचा मोबाईल बंनर रजिस्टर करीत असत. अशा प्रकारे एकाच व्यक्तीच्या नावाची असणारी शेकडो आधार कार्डात फेरबदल करत खोटी कागदपत्रं तायर करण्यात येत असत. हे काम टोळीचा म्होरक्या दीपक मुजरानी त्याची पत्नी विनिता आणि साथीदार करीत होते. त्यानंतर बनावट कंपन्या आणि जीएसटी नंबर ते मिळवित असतं. हा जीएसटी नंबर सीएला विकण्यात येत असे. या टोळीत १२ सीएंचा समावेश असल्याचंही समोर आलं आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.