अल्पवयीन मुलीवर बलात्कार सख्या दोघां भावंना 25 वर्षाची शिक्षा; जिल्हा न्यायालयाचा निकाल
सांगली: अल्पवयीन मुलीवर खाऊचे आमिष दाखवून तसेच जबरदस्तीने बलात्कार केल्याबद्दल कडेगाव येथील दोघा भावांना २५ वर्षे सक्तमजुरी व १० हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा सत्र न्यायाधीश डी. एस. हातरोटे यांनी सुनावली. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील श्रीमती वैशाली मूरचिटे यांनी काम पाहिले.
यशवंत मारुती ऐवळे (वय ६५) व निवास मारुती ऐवळे (वय ५८ दोघे रा. शिवाजी नगर, कडेगाव, ता. कडेगाव, जि. सांगली) अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत. सरकार पक्षाला कडेगाव पोलीस ठाणे येथील हवालदार जे. आर. जाधव, पैरवी कक्षातील वंदना मिसाळ, तुराई , सुप्रिया भोसले यांनी सरकार पक्षाला मदत केली.यशवंत ऐवळे याला भा.दं.वि.सं. कलम ३७६ (२) (एन), ३७६ (३) आणि पोक्सो अॅक्ट कलम ६ प्रमाणे दोषी धरुन त्याला २५ वर्षे सक्तमजुरी व १० हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक वर्ष जादा सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली. निवास ऐवळे याला भा.दं.वि.सं. कलम ३७६ (३) आणि पोक्सो अॅक्ट कलम ६ प्रमाणे दोषी घरून २५ वर्षे सक्तमजुरी व ९ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक वर्ष जादा सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली.खटल्याची पार्श्वभूमी अशी ; या प्रकरणाची फिर्याद देण्यापूर्वी चार महिने अगोदर यशवंत ऐवळे यांने खाऊ देण्याचे आम्हीच दाखवून पीडित मुलीला ऊसाचे शेतात नेऊन जबदरस्तीने ४ वेळा शारीरीक संबंध केले होते. तसेच दिनांक १६ मे २०२० रोजी पीडित मुलगी अंडी आणण्यासाठी गावात गेली होती. त्यावेळी मुलगी रस्त्याने जात असताना निवासने पिडीत मुलीचा हात धरून शेडमध्ये ओढून नेऊन शारिरीक संबंध केले व कोणाला काही सांगू नकोस नाहीतर तुला व तुझ्या घरच्यांना ठेवणार नाही अशी धमकी दिली.
त्यानंतर पिडीतेच्या पालकांनी कडेगाव पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप साळुंखे यांनी यांनी तपास करून दोन्ही आरोपी विरुद्ध आरोपपत्र दाखल केले. घटनास्थळाचा पंचनामा, आरोपीचे, पीडितेचे डी एन ए सँपल, न्यायवैज्ञानिक प्रयोगशाळा, पुणे आणि या गुन्हयाच्या अनुषंगिक तपासटिपणे ग्राह्य धरून न्यायालयाने शिक्षा सुनावली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.