Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

नागरिकांनो लक्ष द्या! 'या' दिवशी बदलता येणार नाही 2000 च्या नोटा

नागरिकांनो लक्ष द्या! 'या' दिवशी बदलता येणार नाही 2000 च्या नोटा


आज पासून जुन 2023 सूरु झाला आहे. यामुळे दर महिन्याप्रमाणे या महिन्यात देखील देशातील बँका किती दिवस बंद राहणार याची माहिती आरबीआयने दिली आहे. जर तुम्हाला बँकेतील कोणतेही महत्त्वाचे काम जून महिन्यात पूर्ण करायचे असेल तर या संपूर्ण महिन्यातील सुट्टीची यादी नक्की पहा.

आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार या महिन्यात एकूण 12 दिवस बँका बंद राहतील. बँकांच्या सुट्ट्यांच्या यादीत साप्ताहिक सुट्ट्यांचाही समावेश आहे. अशा परिस्थितीत जर कोणाकडे बँकेशी संबंधित काही महत्त्वाचे काम असेल तर ते वेळेत पूर्ण करा, अन्यथा तुम्हाला अडचणीचा सामना करावा लागू शकतो. मात्र, या सुट्ट्या सर्व राज्यांमध्ये लागू होणार नाहीत.

जूनमध्ये 12 दिवस बँका बंद

आरबीआयने जून 2023 च्या बँक सुट्ट्यांची यादी प्रसिद्ध केली आहे. जून महिन्यातील शनिवार व रविवारच्या सुट्यांव्यतिरिक्त अनेक राज्यांमध्ये रथयात्रा, खर्ची पूजा यांसारख्या सणांमुळे बँका बंद राहतील. ईद उल अजहा सण देखील आहे. बँकेच्या सुट्ट्या राज्यानुसार बदलतात. जूनमध्ये एकूण 12 दिवस बँका बंद राहतील. आरबीआयच्या म्हणण्यानुसार, प्रत्येक बँकेला साप्ताहिक सुट्टी म्हणजे रविवार आणि दुसरा आणि चौथा शनिवार असतो.

जूनमध्ये या दिवशी बँका बंद राहतील

4 जून 2023 : रविवार साप्ताहिक सुट्टी

10 जून 2023: दुसरा शनिवार सुट्टी

11 जून 2023: रविवार साप्ताहिक सुट्टी

15 जून 2023: गुरुवार, राजा संक्रांती (या दिवशी ओडिशा आणि मिझोराममध्ये बँक सुट्टी)

18 जून 2023: रविवार साप्ताहिक सुट्टी

20 जून 2023: शनिवार, रथयात्रेची सुट्टी (या दिवशी ओडिशा आणि मणिपूरमध्ये बँक सुट्टी)

24 जून 2023: बुधवार, महिन्याचा चौथा शनिवार

25 जून 2023: रविवार साप्ताहिक सुट्टी

26 जून 2023: सोमवार, खारची पूजेची सुट्टी (त्रिपुरामध्ये या दिवशी बँका बंद राहतील)

28 जून 2023: बुधवार, ईद-उल-अजहा सुट्टी (या दिवशी जम्मू-काश्मीर, महाराष्ट्र आणि केरळमध्ये बँका बंद राहतील)

29 जून 2023: गुरुवार, ईद-उल-अझाची सुट्टी (या दिवशी देशभरातील बँका खुल्या राहतील)

30 जून 2023: शुक्रवार, इद-उल-अझहा सुट्टी (या दिवशी मिझोराम आणि ओडिशामध्ये बँका बंद राहतील.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.