पाळीव कुत्रा भुंकल्याने 2 जणांची गोळ्या झाडून हत्या
मध्य प्रदेशातील देवासमध्ये रविवारी सकाळी पाळीव कुत्र्याच्या भुंकण्यावरून झालेल्या वादात दोघांची गोळ्या झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या गोळीबारात एक जण जखमी झाला आहे. देवास येथील सटवास परिसरात पाळीव कुत्रा भुंकल्याने दोन कुटुंबांमध्ये मोठा वाद झाला. वाद इतका विकोपाला गेला की एका कुटुंबातील व्यक्तीने गोळीबार केला. यावेळी गोळी लागल्याने दोन जणांना आपला जीव गमवावा लागला.
गुठाण गावातील गोदारा आणि डेडध कुटुंबांमध्ये ही गोळीबाराची घटना घडली. राजेश गोदारा हे रविवारी सकाळी त्यांच्या पाळीव कुत्र्याला फिरायला घेऊन गेले होते. ते घरी परतत असताना त्यांचा कुत्रा डेडध कुटुंबातील एका सदस्यावर भुंकायला लागला. कुत्रा भुंकल्याचा राग आल्याने दोन्ही बाजूंमध्ये मोठा वाद झाला या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. प्रकरण इतके वाढले की गोदारा कुटुंबातील तिघांवर डेडध कुटुंबातील सदस्याने गोळ्या झाडल्या. या गोळीबारात दोघांचा जागीच मृत्यू झाला. यावेळी राजेश गोदारा यांचा जागीच मृत्यू झाला. तर कैलास गोदारा यांचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला, तर तिसऱ्या जखमी व्यक्तीला इंदूर येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
याप्रकरणी पोलिसांनी वरुण आणि राजेश देडद या दोन आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे. मृत कैलास गोदारा हे भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस अनिल गोदरा यांचे वडील असल्याची माहिती मिळत आहे. गोळीबाराच्या घटनेनंतर काही वेळातच जिल्हा प्रशासन आणि महापालिकेने आरोपींची काही बेकायदा बांधकामे जमीनदोस्त केली आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.