Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पुण्यात मध्यरात्री मार्केटयार्ड परिसरातील हॉटेल रेवळला भीषण आग ; 2 कामगार ठार तर 3 कामगार होरपळले

पुण्यात मध्यरात्री मार्केटयार्ड परिसरातील हॉटेल रेवळला भीषण आग ;  2 कामगार ठार तर 3 कामगार होरपळले 


पुणे : पुण्यात मध्यरात्री मार्केटयार्ड परिसरातील हॉटेल रेवळला भीषण आग लागली. या आगीत हॉटेलमधील ३ कामगार होरपळले. यातील दोघे कामगार ठार झाले असून एकाची प्रकृती चिंताजनक आहे. घटनास्थळी अग्निशामक दल आणि पोलिसांचे पथक पोहचले असून आगीवर नियंत्रण मीवळण्याचे काम सुरू झाले आहे. दरम्यान, ही आग कशी लागली हे अद्याप समजू शकले नाही. मृत कामगारांची नावे देखील समजली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार काल मध्यराञी एक वाजता मार्केटयार्ड, गेट नंबर एक येथील हॉटेल रेवळ सिद्धि येथे आगीची घटना घडली. हे हॉटेल आत मधून बंद होते. दरम्यान, आगीची घटना कळताच अग्निशामक दलाचे कर्मचारी घटनास्थळी पोहचून त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. हॉटेलच्या आत अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी पाहणी केली असता, आतमधे पोटमाळ्यावर झोपलेल्या ३ कामगारांना जखमी अवस्थेत बाहेर काढून रुग्णालयात रवाना केले. मात्र, यातील कामगारांचा मृत्यू झाला तर एकावर उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती देखील चिंताजनक आहे. दरम्यान, ही आग कशी लागली याची माहिती मिळू शकली नाही. पण शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहेत. मृत कामगारांची नावे समजू शकली नाही.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.