Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

15 हजाराच्या लाचप्रकरणी औषध निरीक्षक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

15 हजाराच्या लाचप्रकरणी औषध निरीक्षक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात



भंडारा : 20 हजाराच्या लाचेची मागणी करून 15 हजाराची लाच घेणार्‍या भंडारा अन्न व औषध प्रशासन विभागातील औषध निरीक्षकास अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे. त्यांच्याविरूध्द भंडारा शहर पोलिस स्टेशनमध्ये  गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. 

प्रशांत राजेंद्र रामटेके (46, पद - औषध निरीक्षक, अन्न व औषध प्रशासन, भंडारा) असे लाच घेणार्‍याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, यातील तक्रारदार यांच्या भावसूनीचे नावाने कीर्ती मल्टिस्पेसिऍलिटी हॉस्पिटल मध्ये औषध दुकान सुरु करण्यासाठी तक्रारदार यांनी अन्न व औषध प्रशासन भंडारा यांचेकडे अर्ज दिला होता. तक्रारदार यांनी दाखल केलेल्या फार्मसी च्या परवान्याच्या कागदपत्रामध्ये कुठल्याही प्रकारच्या त्रुट्या न काढल्यामुळे फार्मसीचे परवाना मंजूर झाला आहे त्याचाच मोबदला म्हणून आलोसे यांनी तक्रारदार यांना 20000 रुपयांची मागणी केली. पडताळणी कारवाई दरम्यान पंचांसमक्ष तडजोडीअंती 15000 रुपये लाचेची मागणी करून लाच रक्कम स्विकारण्याची तयारी दर्शवली. सापळा कारवाई दरम्यान पंचांसमक्ष आरोपी यांनी 15000 रुपये लाच रक्कम स्विकारली.

ही कारवाई नागपूर परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक राहुल माकणीकर, पोलिस उप अधीक्षक डॉ. अरूणकुमार लोहार  यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अमित डहारे, पोलिस उप निरीक्षक संजय कुंजरकर, पोलिस हवालदार मिथुन चांदेवार, पोलिस नाईक अतुल मेश्राम, पोलिस अंमलदार चेतन पोटे, मयूर शिंगणजुडे, विवेक रणदिवे, राजकुमार लेंडे, विष्णू वारठी, शिलपेंद्र मेश्राम आणि चालक पोलिस राहुल राऊत यांच्या पथकाने केली आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.