Breaking News

    Loading......

Sangli Darpan

Krushnakath News

13 हजारांची लाच घेतांना 3 पोलिसांना रंगेहात पकडण्यात आले; गुन्हा दाखल

13 हजारांची लाच घेतांना 3 पोलिसांना रंगेहात पकडण्यात आले; गुन्हा दाखल 



पुण्यातील येरवडा परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.अपघाताची तक्रार दाखल करुन घेण्यासाठी ट्रॅव्हल व्यवसायिकाकडून तेरा हजाराची लाच स्वीकारणाऱ्या हवालदाराला सोमवारी (१२ जून) मध्यरात्री अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी तीन पोलीस हवालदारांना लाचलुचपत विभागाच्या पथकाने मंगळवारी (13जून)ही कारवाई केली आहे.

या लाचखोरी प्रकरणी पोलीस हवालदार राजेंद्र दिक्षीत याला अटक करण्यात आली असून हवालदार जयराम सावलकर आणि विनायक मुधोळकर यांच्यावर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. हे तिघेही येरवडा पोलीस ठाण्यात कार्यरत होते. याप्रकरणी 24 वर्षीय ट्रॅव्हल्स व्यावसायिकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,२४ वर्षीय तक्रारदाराचा यांचा ट्रॅव्हल्सचा व्यवसाय आहे. काल संध्याकाळी तक्रारदार आपल्या कारच्या झालेल्या अपघाताची तक्रार दाखल करण्यासाठी येरवडा पोलीस ठाण्यात आले होते. पण तक्रार दाखल करुन घेण्यासाठी पोलीस हवालदार जयराम सावळकर, विनायक मुधोळकर, राजेंद्र दीक्षित यांनी तक्रारदारांकडे 20 हजार रुपयांची मागणी केली. तडजोड करुन शेवटी 13 हजार रुपयांवर सौदा ठरला. 

पण येरवडा पोलीस स्टेशनमध्येच हवालदार राजेंद्र दीक्षित याला लाच घेताना रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले. लाचलुचपत विभागाचे पोलीस निरीक्षक भारत साळुंखे, पोलिस निरीक्षक प्रवीण निंबाळकर,सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मुकुंद आयाचीत, पोलीस शिपाई भूषण ठाकूर, पोलीस शिपाई पांडुरंग माळी येरवडा यांनी ही कारवाई केली.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.